Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्याची राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी निवड

राज्यात उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्याची राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी निवड

The factory that pays the highest price for sugarcane in the state has been selected for this national level award | राज्यात उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्याची राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी निवड

राज्यात उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्याची राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी निवड

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने उत्कृष्ट वार्षिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केला आहे.

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने उत्कृष्ट वार्षिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्यावतीने देशातील उत्कृष्ट साखर कारखान्यांसाठी वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार जाहीर झाले आहेत.

यात राज्यात उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचीही राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

पुरस्कार वितरण केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (ता. २२) या पुरस्कारांची घोषणा केली. संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यावेळी उपस्थित होते.

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने उत्कृष्ट वार्षिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केला आहे.

याबाबत राष्ट्रीय साखर संघाने सोमेश्वर कारखान्याशी पत्रव्यवहार करत ही माहिती दिली आहे. संघाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या सोमेश्वर कारखान्याने उत्कृष्ट कामगिरी आणि कार्यप्रणालीतील उत्कृष्टतेची दखल घेतली आहे.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेडची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली (एनएफसीएसएफ) कडून प्रतिष्ठित वार्षिक कार्यक्षमता पुरस्कार २०२३-२४ साठी निवड झाली आहे.

तुमच्या कारखान्याने सादर केलेल्या डेटाच्या मूल्यांकनाच्या आधारे, भारत सरकारच्या सहसचिव, सहकार मंत्रालय यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीने निकाल अंतिम केले आहेत.

तुमच्या कारखान्याची उच्च साखर पुनर्प्राप्ती क्षेत्रातील एकूण कामगिरीच्या श्रेणीअंतर्गत पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार दिल्ली येथे एका भव्य समारंभात प्रदान केला जाईल.

सोमेश्वर कारखाना नेहमीच राज्यात अग्रेसर ठरला आहे. मागील महिन्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन आणि उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर असे तीन पुरस्कार मिळाले आहेत.

अधिक वाचा: Kodwa Us : उसाचा खोडवा ठेवणार असाल तर ह्या ६ गोष्टी करू नका; वाचा सविस्तर

Web Title: The factory that pays the highest price for sugarcane in the state has been selected for this national level award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.