राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेंदुची झाडे आहेत. या परिसरातील जंगलात दरवर्षी मे महिन्यात तेंदूपाने संकलनाचा हंगाम असतो. तेंदूपाने हंगाम म्हणजे विडी वळण्यासाठी लागणारी तेंदू वृक्षाची पाने तोडून ती संकलित करण्याचा व्यवसाय होय.
याच अनुषंगाने राज्य सरकारने आज गुरुवार (दि.०२) रोजी यंदाच्या तेंदू हंगामाकरिता तेंदू पाने खरेदी दरास मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र वनोत्पादन (व्यापाराचे विनियमन) अधिनियम, १९६९ च्या तरतुदीनुसार दिनांक १५.१०.२०२४ रोजीच्या शासन अधिसूचनानुसार गठीत करण्यात आलेल्या सल्लागार समितीची दिनांक ०४.१२.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तेंदू पाने खरेदी दराबाबत शिफारस करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ठ वनोपज) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी सल्लागार समितीने शिफारस केल्यानुसार सन २०२५ च्या तेंदू हंगामाकरिता शासकीय / खाजगी भुमितून तेंदू पाने खरेदी दरास मान्यता दिली आहे.
यंदा करिता असलेले तेंदू पाने खरेदी दर पुढील प्रमाणे
अ.क्र. | प्रभागातील घटक | प्रतीप्रमाण गोणी | |
शासकीय भुमीतून खरेदी दर रुपये | खाजगी भुमीतून खरेदी दर रुपये | ||
१. | गडचिरोली वन वृत्तातील भामरागड, सिरोंचा, आलापल्ली, वडसा व गडचिरोली वन विभागातील सर्व घटक (गडचिरोली जिल्हा) | ४२५०/- | ४३००/- |
२. | चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ व अमरावती वनवृत्तातील सर्व घटक (गडचिरोली वगळता विदर्भातील सर्व जिल्हे) | ३०००/- | ३०५०/- |
३. | छत्रपती संभाजीनगर, धुळे, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि नाशिक वनवृत्तातील सर्व घटक (गडचिरोली व विदर्भातील सर्व जिल्हे वगळून महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्हे) | २७००/- | २७५०/- |
हेही वाचा : शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार