पुणे : राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांची (तलाठी) हजारो पदे अनेक जिल्ह्यांत रिक्त असल्याने सद्यःस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे.
मात्र, डिसेंबर अखेरीस राज्यात तलाठ्यांची १ हजार ७०० पेक्षा जास्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. पदभरतीमुळे तलाठ्यांवरील कामाचा भार हलका होईल, तसेच नागरिकांची कामेही वेळेत मार्गी लागतील.
पुणे जिल्ह्यात १७ रिक्त पदे भरली जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. तलाठी भरती केल्यास तलाठी कार्यालयातील कामे वेळेत पूर्ण होऊ शकतील.
नागरिकांना तत्काळ सेवा मिळणार आहे. भूमीसंबंधी नोंदणी, ई-हक्क नकल, फेरफार आणि इतर प्रशासकीय कामे अधिक कार्यक्षमतेने होणार आहेत.
सध्या पुणे जिल्ह्यात एका तलाठ्याकडे ३ ते ४ गावांचा कारभार आहे. यामुळे तलाठ्यांवर अधिक कामाचा भार आहे. बीड जिल्ह्यात तलाठ्यांची मंजूर पदे ९२९ आहेत. त्यापैकी ९१२ तलाठी कार्यरत असून १७ पदे रिक्त आहेत.
यात 'पेसा'अंतर्गत १५ पदे मंजूर असून त्यातील १३ पदे कंत्राटी पद्धतीने भरली आहेत. तर २ पदे रिक्त आहेत. अर्ज प्रक्रिया डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. परीक्षा आणि इतर महत्त्वाच्या तारखा नंतर जाहीर होणार आहेत.
अधिक वाचा: तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे का? हे ऑनलाईन कसे चेक कराल? वाचा सविस्तर
