Join us

Swabhimani Us Parishad : स्वाभिमानी ची उद्या २३ वी ऊस परिषद शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 13:55 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या शुक्रवारी (दि. २५) २३ वी ऊस परिषद होत आहे. येथील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या ऊस परिषदेतील निर्णयाकडे शेतकऱ्यांसह कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या शुक्रवारी (दि. २५) २३ वी ऊस परिषद होत आहे. येथील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या ऊस परिषदेतील निर्णयाकडे शेतकऱ्यांसह कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

गतवर्षीच्या उसाचे अंतिम बिल प्रतिटन २०० रुपये तसेच यावर्षी तुटणाऱ्या उसाला एफआरपी पेक्षा किती जादा दर निश्चित करावा यासाठी माजी खासदार राजू शेट्टी भूमिका मांडणार आहेत. ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आली आहे.

ऊस परिषदेची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागात स्वाभिमानीने जनजागृती केली आहे. यंदाच्या ऊस परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित राहतील, यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, प्रकाश पोपळे, माजी जि.प. सदस्य सावकर मादनाईक उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :स्वाभिमानी शेतकरी संघटनाशेतकरीशेतीऊससाखर कारखानेकोल्हापूरराजू शेट्टी