ओतूर : दरवर्षी मे महिना आला की, बाजरीपीक काढणीला सुरुवात होत असते. परंतु, यावर्षी अवकाळी अवकाळी पावसामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्याच्या मनाची द्विधा अवस्था झाली असून, बाजरीपीक परिपक्व होण्याच्या आधी काढणी करावी लागत आहे.
जुन्नर तालुक्यामध्ये यावर्षी बाजरीची खूप कमी प्रमाणात पेरणी झालेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बाजारभावात स्थिरता, त्यात अवकाळीचा धोका, शेतीचे कमी झालेले प्रमाण यामुळे शेतकरी कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, गोंडा याकडे अलीकडच्या काळात जास्त करून वळल्याचे पाहायला मिळत आहे.
यावर्षी बाजरी पिकाचे उत्पादन जरी चांगले असले, तरी पेरणीही अत्यल्प प्रमाणात झाली आहे. कारण गेल्या तीन वर्षांपासून बाजरीचा बाजारभाव वाढलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्याला बाजरी पीक करायला परवडत नाही.
सध्या बाजरीचा किलोचा भाव २८ ते ३२ रुपये आहे. सध्याच्या हंगामामध्ये एका पिशवीला दहा ते बारा पोती बाजरीचे उत्पादन निघते तसेच बाजरीची राखण करावी लागते.
कारण पाखरांसाठी फळझाडे ही अत्यल्प प्रमाणात राहिली आहेत. त्यामुळे बाजरीच्या पिकावर पक्ष्यांचे बसण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बाजरी पीक हे वाट्चाने राखण करावे लागते.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये धान्य व वैरण शिल्लक राहते. शेतकरी हा मुख्यत्वे वैरणीसाठी बाजरी करत असतो, असेही शेतकरी संतोष शिर्के यांनी सांगितले.
३२ रुपये किलोबाजरीच्या पिकावर पक्ष्यांचे बसण्याचे प्रमाण जास्त असते. बाजरी पीक हे वाट्याने राखण करावे लागते. शेतकऱ्यांच्या हातामध्ये धान्य व वैरण शिल्लक राहते.
अधिक वाचा: कोणत्याही जमिनीचा पोटहिस्सा खरेदी करताय? आता राज्य शासनाचा हा नवा नियम; वाचा सविस्तर