Join us

उन्हाचा पारा वाढला, शेतकरी बांधवानो आरोग्य सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 12:08 IST

सध्या सर्वत्र कडक उन्हाचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः उन्हाळी लागण्याचा अनेकांना त्रास होतो. तसेच याचा परिणाम अनेकदा शेतात उन्हात काम करतांना शेतकरी बांधवांना देखील होतो. त्याकरिता काय उपाय आहेत ते वाचा सविस्तर.

सध्या सर्वत्र कडक उन्हाचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः उन्हाळी लागण्याचा अनेकांना त्रास होतो. उन्हाळी लागल्यानंतर जळजळ होते, काही वेळा असह्य वेदना होतात. तसेच याचा परिणाम अनेकदा शेतात उन्हात काम करतांना शेतकरी बांधवांना देखील होतो. त्याकरिता काय आहे उपाय वाचा सविस्तर. 

उन्हाळी लागल्यानंतर होणारा विविध त्रास टाळण्यासाठी पोटभर पाणी प्यावे, बाहेर जाणे टाळावे, अनवाणी उन्हात फिरू नये. उन्हाळी लागल्यानंतर खडीसाखर खावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच वेळीच आराम न मिळाल्यास लवकरात लवकर आपल्या जवळच्या आरोग्य तज्ञांना कळवून उपचार घ्यावे. 

उन्हाळी लागल्यावर घरगुती उपाय

थंड हवा असेल अशा ठिकाणी बसावे. भरपूर पाणी किंवा ताक असे पदार्थ प्यावेत. मीठ व साखरेचे सेवन करावे. हातापायांना हलक्या हाताने मसाज करावी. अधिकाधिक थंड पाणी पिऊन थोड्या थोड्या वेळाने लघवीला जावे. यामुळे क्षारयुक्त पाणी कमी होऊन उन्हाळी थांबण्यास मदत होईल. पाण्यामध्ये खडीसाखर घालून पाणी प्यावे. तसेच नारळपाणी प्यावे.

चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊस उत्पादनाचा ब्रॅंड 

अतिश्रमाचे काम टाळा

मार्च महिना सुरू होताच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहे. सद्यःस्थितीत पारा ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. या दिवसांमध्ये दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडायचे असल्यास डोक्यावर टोपी, शरीर झाकेल असे कपडे घालावे. शिळे अन्न तसेच पचनासाठी अतिजड पदार्थ खाऊ नये. घट्ट, गडद रंगाचे कपडे शक्यतो टाळावे. अतिश्रमाचे काम दुपारच्या वेळी करू नये, ताक, दही यासारखे पदार्थ घ्यावे. - डॉ. शशिकांत मुळे, गढी

टॅग्स :हेल्थ टिप्सशेतकरीसमर स्पेशलशेतीआरोग्य