दीपक देशमुखसातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोमात सुरू झाला असला तरी दराबाबत मात्र मनमानी सुरू असून, अद्यापही सहा साखर कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही.
विशेष म्हणजे, हे कारखाने मंत्री आणि आजी-माजी खासदारांचे आहेत तसेच उताऱ्याबाबतही शेतकऱ्यांकडून तक्रारी असून थर्ड पार्टी ऑडिटची मागणी करण्यात येत आहे. साखर जिल्ह्यात १७ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.
मात्र, साखरेचा उतारा गेल्या तीन वर्षांपासून घटू लागला आहे. त्याच्या थर्ड पार्टी ऑडिटची मागणी होत आहे. मागील साखर उताऱ्यावर यावर्षीचा एफआरपी ठरत असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी दर मिळत आहे.
यंदा १०.२५ बेस रिकव्हरी गृहित धरून ३,५५० एफआरपी निश्चित केली आहे. परंतु, दरांबाबत अद्यापही कारखान्यांकडून मनमानी सुरू आहे. सहा साखर कारखान्यांनी अद्यापही दर जाहीर केलेला नाही.
त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊसतोड झाल्यानंतर कारखाने देईल तो दर सभासदांना घ्यावा लागू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर दर जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
या १० कारखान्यांकडून दर जाहीर◼️ जिल्ह्यात कृष्णा, जयवंत शुगर्स, रयत-अथणी, सह्याद्री, जरंडेश्वर, शिवनेरी, अजिंक्यतारा यांनी ३५०० रुपये.◼️ माण-खटाव, ग्रीन गोपूज, वर्धन अॅग्रो ३३०० रुपये.◼️ दत्त इंडिया (साखरवाडी) ३४०० रुपये.◼️ पाटणच्या देसाई कारखान्याने ३००० दर जाहीर केला आहे.
दर न जाहीर करणारे कारखाने◼️ प्रतापगड, किसनवीर, खंडाळा, स्वराज, शरयू, श्रीराम या सहा कारखान्यांनी अजूनही दर जाहीर करण्याची तसदी घेतलेली नाही.◼️ विशेष म्हणजे यापैकी बहुतेक कारखान्यांचा ताबा मंत्री, आजी माजी खासदारांकडे आहे.
विलंब व्याजावरही मौनउसाचे बिल १५ दिवसांत न दिल्यास वार्षिक १५ टक्के व्याजासह रक्कम देणे बंधनकारक आहे. पण, दरच नसेल तर बिल व व्याजाचा हिशेब कोण करणार? असा सवालही उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात ३६.४९ लाख मेट्रिक टन गाळपअथणी शुगर्स: १,९५,५१०शरयू: २,७१,२७०जयवंत शुगर्स: २,७०,३९१स्वराज्य: २,८४,३७७प्रतापगड: ७४,५८०अजिंक्यतारा: १,९७,९१०कृष्णा: ५,४५,९७९किसनवीर: १,८७,७९०श्रीराम: १,८७,४७२खंडाळा: १,१५,०३०दत्त इंडिया: ३,४२,८२० शिवनेरी: २,८१,४३०सह्याद्री: २,५४,७००खटाव माण: २,३१,६६५देसाई कारखाना पाटण: २०,९८५ग्रीन पॉवर शुगर: १,१७,४३०एकूण: ३६,४९,३३९
कायदेमंडळात बसणारेच कायदे मोडत असून, नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना न्याय देत नाहीत. दुसरीकडे १७ नोव्हेंबरच्या बैठकीत दर न जाहीर करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता; पण आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 'या' सात साखर कारखान्यांनी पहिल्या १० दिवसांचे ऊस बिल केले जमा
Web Summary : Satara's sugar factories begin crushing season, but many haven't declared cane prices, sparking farmer discontent. Ten factories announced rates, ranging from ₹3000 to ₹3500. Six, mostly controlled by ministers, remain silent, raising questions about delayed payments and interest.
Web Summary : सतारा की चीनी मिलों में पेराई सत्र शुरू, लेकिन कई ने गन्ने की कीमतें घोषित नहीं कीं, जिससे किसानों में असंतोष है। दस मिलों ने ₹3000 से ₹3500 तक की दरें घोषित कीं। ज्यादातर मंत्रियों द्वारा नियंत्रित छह मिलें चुप हैं, जिससे विलंबित भुगतान और ब्याज के बारे में सवाल उठ रहे हैं।