Sugarcane Factory : मागील वर्षी पावसाळा कमी झाला असला, तरी यंदा पावसाळा चांगला झाला. मात्र उसाच्या लागवडीमध्ये मोठी तूट दिसून येते.
त्यामुळेच राज्यातील लातूर, परभणी, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांतील कारखाने उसाच्या शोधात बारूळ व पेठवडज परिसरात आले आहेत.
ऊसतोड कामगार व यंत्रणेद्वारे ऊस उचलण्याची कामे सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चिंता मिटली आहे. यंदा दिवाळीच्या आधीच राज्यातील कारखान्याच्या टोळ्या ऊस तोडणीसाठी बारूळ परिसरात हजर झाल्या होत्या.
तसेच, विधानसभा निवडणूक असल्यामुळे अनेक ऊसतोड कामगार निवडणूक झाल्यानंतरच जायचे तर काही निवडणुकीचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही, त्यामुळे दोन विचारांचे गट कामगार निर्माण झाले होते.
काही ऊसतोड मजुरांच्या टोळ्या हार्वेस्टर आणि ऊस वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या आधी व निवडणूक झाल्यावर ऊस वाहतूक
करणारी वाहने दिसत आहेत.
कंधार तालुक्यातील मानार प्रकल्प व पेठवडज मध्यम प्रकल्पाशेजारी बारूळ, चिंचोली, धर्मापुरी, तेलूर, वरवंट, काटकळंबा, बाचोटी, पेठवडज,
मानसपुरी, जंगमवाडी, वळसंगवाडी या गावांत मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली.
गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्याला कलंबर कारखाना असलेला बंद पडला, तसा एकही हक्काचा कारखाना नसल्या परिसरात उसासाठी क्षेत्र मोठे असतानाही नांदेड व परिसरातील जिल्ह्यातील कारखान्यावर ऊस उत्पादक लागवड करतात. ऊस नेण्यासाठी दरवर्षी चार ते पाच हजार ऊस तोडणीसाठी देतात.
आम्हाला ऊस द्या, चांगला भाव देऊ
■ मागील दोन वर्षांपासून बारूळ व हळदा येथे गूळ कारखाना सुरू झाल्याने काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु, त्याची क्षमता कमी असल्यामुळे व उत्पादक जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना कारखान्यांना ऊस देण्याशिवाय पर्याय नव्हता.
■ यावर्षी उसाचे उत्पादन कमी झाल्याने राज्यातील नको ते कारखानदार आम्हाला ऊस द्या, म्हणून बारूळ परिसरात दाखल झाले.
दररोज प्रत्येक कारखान्याचे चेअरमन येऊन भेटी देत आहेत. शेतकयांना आश्वासने देत आहेत.