सोलापूर : पहिल्या पंधरवड्याचेही बिल अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नसताना अनेक साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांना दिलेल्या अहवालात पैसे दिल्याचे दाखविल्याचे दिसत आहे.
श्री. सिद्धेश्वर सोलापूर व श्री. सिताराम महाराज खर्डी या साखर कारखान्यांनी मात्र खरी माहिती दिली आहे. दोन महिन्यांत १,४८५ कोटी ऊस उत्पादकांना दिल्याचे, तर २९३ कोटी रुपये देय असल्याचे रिपोर्टवरून दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत ३३ साखर कारखाने सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडे दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या साखर कारखान्यांच्या ऊस गाळपाला काही दिवस दराचा अडथळा आला होता.
मात्र, ऊस गाळप वेगाने सुरू आहे. जिल्ह्याचे ऊस गाळप एक कोटीच्या जवळपास झाले आहे. ऊस तोडणीनंतर १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे बंधनकारक असले, तरी किमान एक महिन्यात तरी ऊस बिल मिळणे अपेक्षित आहे.
आतापर्यंत तीन पंधरवड्यांचे ऊस बिल कारखान्यांनी जमा करणे आवश्यक होते. काही कारखान्यांनी तीन पंधरवड्यांचे पैसे जमा केले असले, तरी अनेक कारखान्यांनी पहिल्या पंधरवड्याची बिलेही जमा केली नाहीत.
साखर सहसंचालक कार्यालयाच्या अहवालात १,४८५ कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याचे, तर २९३ कोटी रुपये देणे असल्याचे दिसत आहे.
कुणी दिली किती पैसे?
श्री. पांडुरंग श्रीपूरने १२६ कोटी
श्री. संत दामाजीने २७ कोटी
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील ११४ कोटी
विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर २३० कोटी
श्री. संत कुर्मदास २ कोटी
लोकनेते बाबुराव पाटील अनगर २३ कोटी
सासवड माळीनगर ३९ कोटी
लोकमंगल बीबीदारफळ ११ कोटी
लोकमंगल भंडारकवठे २२ कोटी
ओंकार शुगर म्हैसगाव ४१ कोटी
सिध्दनाथ शुगर ६ कोटी
जकराया शुगर ३७ कोटी
इंद्रेश्वर शुगर १० कोटी
भैरवनाथ लवंगी २३ कोटी
युटोपियन शुगर १४ कोटी
राजवी अॅग्रो आलेगाव ३२ कोटी
बबनराव शिंदे तुर्कपिंपरी ८३ कोटी
ओंकार शुगर चांदापुरी ७२ कोटी
जयहिंद ५३ कोटी
ओंकार तडवळ ८० कोटी
विठ्ठलराव शिंदे करकंब ८० कोटी
आष्टी शुगर ५२ कोटी
भीमा टाकळीसिकंदर ११ कोटी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे १३ कोटी
धाराशिव १८ कोटी
श्री. शंकर सहकारी ४१ कोटी
अवताडे शुगर ३५ कोटी
श्री. विठ्ठल गुरसाळे १० कोटी
येडेश्वरी शुगर २७ कोटी
कमलाभवानी करमाळा ४५ कोटी
शिवगिरी विहाळ १५ कोटी असे १४८५ कोटी रुपये एफआरपीप्रमाणे दिले असल्याचे अहवालात दिसत आहे.
श्री. सिद्धेश्वरचे ४२.३३ कोटी, सिताराम महाराजने ३२.४७ कोटी इतकी एफआरपीची संपुर्ण रक्कम दिली नसल्याचे दिसत आहे.
अधिक वाचा: पुणे जिल्ह्याला मागे टाकत सर्वाधिक ऊस गाळप करण्यात 'हा' जिल्हा आला राज्यात टॉपवर
