Join us

Sakhar Utpadan : राज्यात विभानिहाय किती टन साखरेचे उत्पादन; उताऱ्यात कोल्हापूर भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:01 IST

राज्यातील गळीत हंगाम वेगाने सुरू असून, ३१ डिसेंबरअखेर १९० साखर कारखान्यातून २९ लाख १५२० टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर : राज्यातील गळीत हंगाम वेगाने सुरू असून, ३१ डिसेंबरअखेर १९० साखर कारखान्यातून २९ लाख १,५२० टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

गतवर्षी याच कालावधीत ते ३८ लाख ३ हजार टन झाले होते. राज्याचा सरासरी साखर उताराही गतवर्षीच्या तुलनेत घटला असून, तो ८.९ वरून ८.६ वर आला आहे.

कोल्हापूर विभागाचा उतारा सर्वाधिक १०.१३ असून सर्वांत कमी नागपूर विभागाचा ४.९२ आहे. राज्यात सहकारी ९६ आणि खासगी ९४ अशा १९० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे.

या कारखान्यांनी ३१ डिसेंबरअखेर ३३८ लाख ९४ हजार टन उसाचे गाळप केले आहे. यातून २९ लाख १५२० टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

विभागनिहाय ऊस गाळप आणि साखर उत्पादन

विभागहंगाम सुरू असलेले कारखानेऊस गाळप (लाख टनामध्ये)साखर उत्पादन (लाख क्विंटलमध्ये)साखर उतारा (सरासरी
कोल्हापूर३९७८.५९७९.६३१०.१३
पुणे३१८४.६४७३.६८८.७१
सोलापूर४१५९.३२४५.२१७.६२
अहमदनगर२५४३.१९३४.३७७.९६
छ. संभाजीनगर१९३०.०८२१.६०७.१८
नांदेड२८३८.८४३३.७४८.६९
अमरावती३.६७२.९९८.१५
नागपूर०.६१०.३०४.९२
एकूण१९०३३८.९४२९१.५२८.६

अधिक वाचा: Sathekhat : साठेखत म्हणजे नक्की आहे तरी काय; का केले जाते साठेखत? पाहूया सविस्तर

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीकोल्हापूरमहाराष्ट्र