परभणी जिल्ह्यामध्ये सद्यःस्थितीत खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथक त निरीक्षकामार्फत अचानक रासायनिक खते, बी-बियाणे व कीटकनाशके कृषी विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली.
अनियमितता आढळलेल्या केंद्रांची सुनावणी घेऊन ज्या कृषी केंद्रांनी अनियमितता करून व त्याबाबत अहवाल पूर्तता सादर केली नाही, त्यांच्या विक्री परवान्यावर कार्यवाही केल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी कळविले.
यामध्ये अनियमितता आढळलेल्या कृषी केंद्रांवर निलंबन तसेच अन्य कारवाई केल्या. मैनापुरी कृषी सेवा केंद्र, आडगाव ता. जिंतूर, निविष्ठा प्रकार - बियाणे (निलंबन कालावधी १५ दिवस), अंजली फर्टिलायझर, जिंतूर, बियाणे (१५ दिवस), हरी ओम ट्रेडर्स चारठाणा, बियाणे (१५ दिवस), वैष्णवी कृषी सेवा केंद्र, गंगाखेड, बियाणे (३० दिवस), भगवानबाबा कृषी सेवा केंद्र, गंगाखेड, बियाणे (१५ दिवस), श्री गणेश कृषी सेवा केंद्र, चारठाणा, बियाणे (७ दिवस), ओंकार कृषी केंद्र, आडगाव ता. जिंतूर, निविष्ठा प्रकार - रासायनिक खत (निलंबन कालावधी - १५ दिवस), हरी ओम ट्रेडर्स चारठाणा, रासायनिक खत (३० दिवस), भगवानबाबा कृषी सेवा केंद्र गंगाखेड, रासायनिक खत (१५ दिवस), सारू कृषी केंद्र पूर्णा, रासायनिक खत (३० दिवस), समर्थ अग्रो एजन्सी, पूर्णा, रासायनिक खत (३० दिवस), बाबाराम अप्पा एक्लारे पूर्णा, रासायनिक खत (३० दिवस), श्री गणेश कृषी सेवा केंद्र चारठाणा, रासायनिक खत (७ दिवस), हरी ओम ट्रेडर्स चारठाणा, निविष्ठा प्रकार कीटकनाशक (निलंबन कालावधी ३० दिवस), श्री गणेश कृषी सेवा केंद्र चारठाणा ता. जिंतूर, कीटकनाशक (७ दिवस) अशी कारवाई केली आहे.
तक्रार आढळल्यास थेट कार्यवाही...
जिल्ह्यामध्ये जादा दराने खत विक्री, रासायनिक खताची साठवणूक करून शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास, भेसळयुक्त खत विक्रीबाबतच्या तक्रारी आढळल्यास भरारी पथकामार्फत मोहीम स्वरूपात कार्यवाही केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
विक्रेत्यांचे धाबे दणाणले...
• विविध तालुक्यांत झालेल्या या भरारी पथकाच्या तपासणी आणि कारवाईमुळे बी-बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
• जिल्ह्यात कृषी विभागाकडून कृषी निविष्ठांची तपासणी होत असली तरी अनियमितता आढळलेल्या दुकानदारांवर प्रभावीपणे कारवाई होणे अपेक्षित आहे.
हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर