पारनेर : पारनेरबाजार समितीत कांदा विक्री केलेल्या व फेरतपासणीत पात्र ठरलेल्या १०८ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ लाख ८८ हजार ९९३ रुपये कांदा अनुदान जमा झाले असल्याचे सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव यांनी सांगितले.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने प्रतिकिलो ३.५० रुपयांप्रमाणे कांदा अनुदान जाहीर केलेले होते.
त्याप्रमाणे बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या ५ हजार ४७८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ कोटी ७३ लाख ७४ हजार ८२० रुपये कांदा अनुदान यापूर्वीच शेतकऱ्यांचे खात्यावर वर्ग करण्यात आलेले होते.
परंतु सदर प्रस्तावात अपात्र झालेल्या शेतकऱ्यांचे पात्रतेचे निकष बदलल्याने अनुदान प्रस्तावांची पुन्हा जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशान्वये लेखापरीक्षकांमार्फत फेरतपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये १०८ शेतकरी कांदा अनुदानास पात्र झाले होते.
सदर शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळण्यासाठी बाजार समितीने सहायक निबंधक सहकारी संस्था पारनेर यांच्या मार्फत जिल्हा उपनिबंधक सह संस्था यांच्या माध्यामातून पणन संचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता.
त्यामध्ये सदर शेतकऱ्यांच्या प्रस्तावास मान्यता मिळून त्यांच्या प्रलंबित अनुदानास शासनामार्फत मंजुरी मिळाली. त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग झाली.
अधिक वाचा: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीचा काय झाला निर्णय? बैठकीत काय ठरले? वाचा सविस्तर
Web Summary : 108 farmers in Parner received ₹15.88 lakh in onion subsidies after re-verification. The subsidy, ₹3.50 per kg, was for onions sold between February and March 2023. Previously, ₹11.73 crore was disbursed to 5,478 farmers. The funds were directly deposited into their bank accounts.
Web Summary : पारनेर में 108 किसानों को पुन: सत्यापन के बाद प्याज सब्सिडी के रूप में ₹15.88 लाख मिले। यह सब्सिडी फरवरी और मार्च 2023 के बीच बेचे गए प्याज के लिए ₹3.50 प्रति किलो थी। इससे पहले, 5,478 किसानों को ₹11.73 करोड़ वितरित किए गए थे। धन सीधे उनके बैंक खातों में जमा किया गया।