महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये (मनरेगा) केळी लागवडीसाठी हेक्टरी २ लाख ८९ हजार अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. किमान पाच गुंठे तर कमाल पाच एकरपर्यंत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घेता येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
अनेक शेतकरी अलीकडे केळीशेतीशेतीकडे वळाले आहे. त्यातच आता राज्य शासनाच्या वतीने फळपिकांच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळपिकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
ज्या अनुषंगाने चांगले पैसे मिळवून देणारे पीक म्हणून केळीकडे पाहिले जाते, त्यामुळे या पिकांचा समावेश यामध्ये केला आहे.
योजनेचे 'हे' आहेत निकष
• लाभार्थीच्या नावे किमान ५ गुंठे तर कमाल ५ एकर जमिनीपर्यंत अनुदान मिळेल.
• जमीन कूळ कायद्याखाली येत असल्यास कुळाची संमती गरजेची अनूसूचित जाती / जमाती / द्रारिद्र रेषेखालील / इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्यांना प्राधान्य असेल.
पहिल्या वर्षी मिळणार १.९७ लाखांचे अनुदान
योजनेमध्ये केळीसाठी पहिल्या वर्षी जमीन तयार करणे, रोपे लागण, आंतर मशागत व पीक संरक्षणासाठी १ लाख ९७ हजार ७२४ रुपये, दुसऱ्या वर्षात भरणी, खते, मशागतीसाठी ४९ हजार ७९६ तर तिसऱ्या वर्षी खते, पाणी व पीक संरक्षणासाठी ४१ हजार ८०० रुपये असे एकत्रित २ लाख ८९ हजार २२० रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभाग, तसेच गाव पातळीवर कृषी सहायकांशी संपर्क साधावा. - जालिंदर पांगरे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, कोल्हापूर.
हेही वाचा : युरोपला केसरची तर आखाताला हापूसची भुरळ; भारतातून ५० देशांना होतो आंबा निर्यात