Lokmat Agro >शेतशिवार > Spice Crops: शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात 'या' मसाला पिकांची धरली कास वाचा सविस्तर

Spice Crops: शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात 'या' मसाला पिकांची धरली कास वाचा सविस्तर

Spice Crops: Latest news Farmers take a keen interest in 'these' spice crops in the Rabi season Read in detail | Spice Crops: शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात 'या' मसाला पिकांची धरली कास वाचा सविस्तर

Spice Crops: शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात 'या' मसाला पिकांची धरली कास वाचा सविस्तर

Spice Crops : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अजित कुंभार (Collector Ajit Kumbhara) यांच्या संकल्पनेतून मसाला पिके लागवडीचा उपक्रम (Activity) हाती घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर

Spice Crops : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अजित कुंभार (Collector Ajit Kumbhara) यांच्या संकल्पनेतून मसाला पिके लागवडीचा उपक्रम (Activity) हाती घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

संतोष येलकर

अकोला : उत्पन्नवाढीची गरज ओळखून, अकोला जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात मसाला पिकांची कास धरली आहे. एक हजार एकर क्षेत्रावर ही लागवड करण्यात आली आहे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अजित कुंभार (Collector Ajit Kumbhara) यांच्या संकल्पनेतून मसाला पिके लागवडीचा उपक्रम (Activity) हाती घेण्यात आला आहे.

पारंपरिक पिकांना (traditional crops) फाटा देत, एक हजार शेतकऱ्यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये मसाला पिकांची लागवड (Cultivation) केली. त्यापैकी काही पिकांची काढणी (Harvesting of crops) आटोपली आहे, तर काही पिके काढणीला आली आहेत.

पारंपरिक पिकांच्या तुलनेत मसाला पिकांतून ५० ते ६० टक्के उत्पन्न वाढणार असल्याने, येत्या काळात जिल्ह्यात मसाला पीक लागवडीत (Cultivation of Spice Crops) वाढ होऊ शकते.

...असे वाढत गेले मसाला पीक क्षेत्र

२२-२३ निरंक

२३-२४ ३० एकर

२४-२५ १,००० एकर

या पिकांची लागवड !

यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कसुरी मेथी, सोप, ओवा, काळे जिरे आदी मसाला पिकांची लागवड केली.

१०२ गावांत लागवड

जिल्ह्यातील १०२ गावांत मसाला पीक लागवड केली आहे. त्यात अकोला तालुका ४२, बार्शीटाकळी ३४ आणि पातूरमधील २६ गावे आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Gavara Farming: कमी पाणी, हलकी जमीन तरी गवारीला किलोला चांगला 'भाव'; काय आहे कारण वाचा सविस्तर

Web Title: Spice Crops: Latest news Farmers take a keen interest in 'these' spice crops in the Rabi season Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.