Lokmat Agro >शेतशिवार > राज्याच्या 'या' तालुक्यात चक्क नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांना बसला बोगस बियाण्यांचा फास

राज्याच्या 'या' तालुक्यात चक्क नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांना बसला बोगस बियाण्यांचा फास

Soybean seeds of a renowned company did not grow at all in this taluka of the state; Farmers were caught with bogus seeds | राज्याच्या 'या' तालुक्यात चक्क नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांना बसला बोगस बियाण्यांचा फास

राज्याच्या 'या' तालुक्यात चक्क नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांना बसला बोगस बियाण्यांचा फास

Soybean Seed Scam : तिवसा तालुक्यातील शिरजगाव, मोहारी, अनकवाडी येथील शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली. परंतु, पंधरा दिवसांपासून है बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीचा चेहरा उघडा पडला आहे.

Soybean Seed Scam : तिवसा तालुक्यातील शिरजगाव, मोहारी, अनकवाडी येथील शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली. परंतु, पंधरा दिवसांपासून है बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीचा चेहरा उघडा पडला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील शिरजगाव, मोहारी, अनकवाडी येथील शेतकऱ्यांनी बापना कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली. परंतु, पंधरा दिवसांपासून है बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीचा चेहरा उघडा पडला आहे.

शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादनाच्या हमीवर यंदा एका विशिष्ट कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली. शेतकऱ्यांनी लॉट नं. ०००७८९ च्या सोयाबीन बियाण्याची खरेदी केली. परंतु, हा लॉट नंबरच बोगस निघाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले असून, दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

रविवारी सकाळी शेतकरी शेतात गेले असता, त्यांना शेजारच्या शेतकऱ्यांनी पेरलेले अन्य कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवलेले दिसले. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी त्या विशिष्ट कंपनीचे सोयाबीन पेरले, त्यांच्या शेतात दाणाही उगवलेला दिसून आला नाही. या बियाण्याने जवळपास साठ शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या सोयाबीन बंगमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे बियाणे भरण्यात आले आहे.

हेक्टर क्षेत्रफळ बाधित झाले असून, शेतकऱ्यांवर हंगामाच्या सुरुवातीलाच आर्थिक संकट कोसळले आहे. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चियाणे विक्रेता व कंपनीचे एरिया मॅनेजर यांना शेतात बोलावून स्थिती दाखविली. तेव्हा बियाण्यामध्ये दोष असल्याचे मान्य करून शेतकऱ्यांना दोन दिवसांमध्ये नुकसानभरपाई देणार असल्याचे कंपनीकडून आश्वस्त करण्यात आले. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी रीतसर तक्रार दाखल केली नाही.

एकरी आठ ते नऊ हजार रुपये खर्च

बापना कंपनीच्या बियाण्याची एक बेंग ३२०० रुपयांना मिळते. सोबत रासायनिक खत व पेरणीचा खर्च धरून एकरी आठ ते नऊ हजार रुपये खर्च येतो.

तक्रारी येताच 'त्या' संबंधित कंपनीच्या बियाण्यांची विक्री बंद केली. बियाणे खरेदी करून अद्याप पेरणी केली नाही, अशा बियाणे परत घेतले आहे. - पंकज कोडलकर, विक्रेता, गुरूदेवनगर.

हेही वाचा : 'लिंबोणी'ने दिली आयुष्याला कलाटणी; ३० गुंठ्यांमध्ये रानबा खरातांनी साधली आर्थिक प्रगती

Web Title: Soybean seeds of a renowned company did not grow at all in this taluka of the state; Farmers were caught with bogus seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.