Soybean Procurement : शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावरील खरेदीची मुदत संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला. शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावाने (Soybean Procurement) खरेदी करण्याबाबत राज्य सरकारने कोणताच निर्णय न घेतल्याने नोंदणी केलेल्या सोयाबीनचे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याबाबत राज्य सरकारने कोणताच निर्णय न घेतल्याने नोंदणी केलेल्या मात्र केंद्रावर विक्री न करता आलेल्या मानवत तालुक्यातील ८५० सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची हमीदर मिळण्याची आशा मावळली आहे. (Soybean Procurement)
खरीप हंगामात १६ हजार ४९२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. सोयाबीनला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, खासगी बाजारपेठेत ३ हजार ८०० ते ४ हजार ३०० रुपयांच्या आतच भाव अडकले. (Soybean Procurement)
केंद्र सरकारच्या नाफेड अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून खरेदी-विक्री संघ आणि इतर तीन खरेदी केंद्रांवर सोयाबीनची विक्री करण्यासाठी २ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त १ हजार २७९ शेतकऱ्यांचेच सोयाबीन खरेदी केले. (Soybean Procurement)
उर्वरित ८५० शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत. खरेदी-विक्री संघाच्या हमीभाव केंद्रावर केवळ १२७८५ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. (Soybean Procurement)
मुदतवाढीनंतरही हाती निराशा
* बारदाना नसल्याने महिनाभर हमीभाव केंद्रावरील काटा महिनाभर बंद होता. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोयाबीन खरेदी पूर्ववत केली खरी, मात्र महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीन खरेदीची मुदत संपली.
* शासनाने पुन्हा ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली. परंतु, तरीही शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करता आले नाही.
मग ही उठाठेव कशासाठी ?
शासनाने शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडतील, यासाठी हमीभावाने शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. वास्तवात नोंदणी करूनही शेतमालाची खरेदी होत नसेल तर ही उठाठेव कशासाठी? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत असून, नाराजी व्यक्त केली जात आहे.
सोयाबीनचे काय करावे
* हमीभावाने खरेदी केल्यास दोन पैसे पदरात पडतील, यासाठी शासनाच्या नियमात नोंदणी केली. मात्र, खरेदी बंद केल्याने शेतकरी कोंडीत सापडले आहेत.
* खासगी बाजारात अपेक्षित भाव नाहीत अन् घरातील सोयाबीनची हमीभावाने खरेदी नाही. त्यामुळे विक्री कुठे करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
तूर नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ
सोयाबीनची नोंदणी करूनही खरेदी न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यात तूर नोंदणीचे आवाहन केले जात असल्याने शेतकऱ्यांनी याकडे सपशेल पाठ फिरवल्याची स्थिती दिसून येत आहे. दोन महिन्यांत केवळ २५ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे पुढे आले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Hamibhav: सोयाबीनच्या ६ हजार रुपये हमीभावाचे काय झाले? वाचा सविस्तर