Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > 'अक्षय्य तृतीये'ला माय मातीच्या कुशीत संस्कारांची पेरणी; शेलगाव जहागीरमध्ये अनोखा शेती सोहळा

'अक्षय्य तृतीये'ला माय मातीच्या कुशीत संस्कारांची पेरणी; शेलगाव जहागीरमध्ये अनोखा शेती सोहळा

Sowing traditions in the lap of mother earth on 'Akshaya Tritiya'; Unique farming ceremony in Shelgaon Jahagir | 'अक्षय्य तृतीये'ला माय मातीच्या कुशीत संस्कारांची पेरणी; शेलगाव जहागीरमध्ये अनोखा शेती सोहळा

'अक्षय्य तृतीये'ला माय मातीच्या कुशीत संस्कारांची पेरणी; शेलगाव जहागीरमध्ये अनोखा शेती सोहळा

'माती हीच माय, अन् गोमाता हीच जीवनदायिनी' या भावनेला साजेसा अनोखा उपक्रम अक्षय्य तृतीयेच्या पावन दिवशी चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर येथे अनुभवायला मिळाला.

'माती हीच माय, अन् गोमाता हीच जीवनदायिनी' या भावनेला साजेसा अनोखा उपक्रम अक्षय्य तृतीयेच्या पावन दिवशी चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर येथे अनुभवायला मिळाला.

सुधीर चेके

'माती हीच माय, अन् गोमाता हीच जीवनदायिनी' या भावनेला साजेसा अनोखा उपक्रम अक्षय्य तृतीयेच्या पावन दिवशी बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर येथे अनुभवायला मिळाला.

प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ ठेंग यांच्या शेतात पार पडलेल्या या उपक्रमात गोमाता पूजन आणि माती पूजन करून शेतकऱ्यांनी आपल्या संस्कृतीची आणि कृतज्ञतेची जपणूक करत शेतीला सकारात्मक दिशा देण्याचा अनोखा उपक्रम यंदा प्रथमच राबविला.

चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर येथे शेती संस्कृती जपणारा आणि आधुनिकतेला जोडणारा एक अनोखा उपक्रम अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रविवारी (दि. १९) रोजी उत्साहात राबविण्यात आला.

प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ ठेंग यांच्या शेतात आयोजित या कार्यक्रमात प्रगतिशील शेतकरी हरीमामा येवले, अजय देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे सदस्य विनायक सरनाईक, कृषी सहायक किंगरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांनी गोमाता आणि मातीचे पूजन करत, ज्या धरतीने आपल्याला अन्न दिले, तिचे संवर्धन करणे हीच खरी सेवा, अशी भावना व्यक्त केली.

दरम्यान यानिमित्ताने एकत्रित आलेल्या शेतकऱ्यांनी एकमेकांच्या साथीने शेती अधिक सक्षम व समृद्ध करूया, असा एकमुखी निर्धार व्यक्त केला. गावातील शेतकरी गटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांसह परिसरातील शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम साधणारा हा उपक्रम शेतीला नवी दिशा देणारा ठरत असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात सकारात्मक विचारांची पेरणी होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

शेतकरी सभेत विचारांची देवाण-घेवाण

यानिमित्ताने पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतीतील बदलते तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, बाजारपेठेतील स्पर्धा, हवामान बदलाचा परिणाम तसेच उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली. शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडत परस्पर सहकार्याची भावना दृढ केली.

जमिनीचा पोत ओळखा, मगच पेरणी करा !

माती परीक्षण म्हणजे शेतीचा आरसा, जमीन काय सांगते हे ऐकून शेती केली, तरच बळीराजाचा हात खऱ्या अर्थाने बळकट होतो. या पृष्ठभूमीवर विविध शेतांमधील माती नमुने एकत्र करून तिचे परीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जमिनीची सुपीकता, पिकांची योग्य निवड आणि वैज्ञानिक शेती पद्धती याबाबत मार्गदर्शन मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा : लिहा येथील शेतकऱ्याची कन्या जिद्द अन् जिकाटीच्या जोरावर बनली न्यायाधीश; आरती सोनुणे यांचा संघर्षमय प्रवास

Web Title : शेलगाँव जहागीर में अक्षय तृतीया पर अनोखा कृषि उत्सव

Web Summary : शेलगाँव जहागीर में अक्षय तृतीया पर भूमि और गायों का सम्मान करते हुए एक विशेष कृषि कार्यक्रम आयोजित किया गया। किसानों ने एकता के माध्यम से कृषि को बढ़ाने, समृद्धि के लिए परंपरा और आधुनिक तकनीकों को अपनाने का संकल्प लिया। सूचित खेती के लिए मृदा परीक्षण पर जोर दिया गया।

Web Title : Akshay Tritiya Celebrated with Unique Farming Ritual in Shelgaon Jahagir

Web Summary : Shelgaon Jahagir marked Akshay Tritiya with a special farming event honoring the land and cows. Farmers pledged to enhance agriculture through unity, embracing tradition and modern techniques for a prosperous future. Soil testing was emphasized for informed farming.