सोलापूर : कोणी म्हणतयं फार्मर आयडी काढला का?, फार्मर आयडी असेल तर बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेय का?
याचेही उत्तर ई-केवायसी केली आहे असे असेल तरीही अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम खात्यावर जमा झाली नसल्याच्या तक्रारी आहेत.
शासनाने पीक नुकसानीची रक्कम मंजूर केली असताना खात्यावर रक्कम जमा होत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांसोबतशेतीचेही नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीची ७ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना ८६७ कोटी ३८ लाख रुपये इतकी रक्कम मंजूर झाली आहे.
यापैकी ४ लाख तीन हजार ४११ शेतकऱ्यांची रक्कम ४८० कोटी १८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असली तरी ई-केवायसी नसल्याने तीन लाख ९५ हजार ४९९ खात्यावर ४६९ कोटी ३५ लाख रुपये पेंडिंग आहे.
बँक खात्यावर दिसत असली तरी ती शेतकऱ्यांना काढता येत नाही. एक लाख २२ हजार ४४० शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे ४० कोटी ८० लाख रुपये जमा झाले आहेत.
८४ हजार शेतकऱ्यांची ४५२ कोटी रक्कम पेंडिंग
◼️ दोन हेक्टरपर्यंतची तीन लाख ८४ हजार शेतकऱ्यांची ४५२ कोटी रुपये इतकी रक्कम पेंडिंग असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदत वाटप तक्त्यावरून दिसत आहे.
◼️ दोन हेक्टरवरील व तीन हेक्टरपर्यंतच्या मंजूर ९५ कोटींपैकी ११ हजार ३६० शेतकऱ्यांची १७ कोटी ४३ लाख रुपये केवायसी कारणामुळे पेंडिंग आहेत.
अधिक वाचा: कर्नाटकातून नवीन कांद्याच्या ४५ हजार गोण्यांची सोलापूर बाजारात आवक; वाचा काय मिळतोय दर?
