Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोमेश्वर कारखान्याकडून चालू गळीत हंगामासाठी पहिला हप्ता जाहीर; कसा दिला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:13 IST

जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १ लाख ९८ हजार १०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे. तसेच डिस्टीलरीमधून ९ लाख २० हजार लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतलेले आहे.

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याच्या सन २०२५-२०२६ चालू गळीत हंगाममध्ये गाळपास येणाऱ्या उसासाठी पहिला हप्ता प्रतिटन ३ हजार ३०० रुपयेप्रमाणे देणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून चालू असून सध्या १० हजार मे. टन प्रतिदिन क्षमतेने गाळप होत आहे. आजअखेर एकूण २ लाख ४ हजार २५५ मे. टन गाळप आहे.

जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १ लाख ९८ हजार १०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे. तसेच डिस्टीलरीमधून ९ लाख २० हजार लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतलेले आहे.

सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून १ कोटी १५ लाख ५४ हजार ९२० युनिट्सची महावितरण कंपनीस विक्री केलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची विकासाची घोडदौड चालू आहे.

गाळप हंगाम २०२५-२६ हा देखील विक्रमी व यशस्विरीत्या पार पडेल अशा प्रकारचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे.

या हंगामामध्ये साधारणपणे १४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून ऊसपुरवठा सातत्याने होण्याच्या दृष्टिकोनातून पुरेशी ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली आहे.

दि. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गळितास आलेल्या उसाची प्रथम हप्त्याप्रमाणे होणारी रक्कम सभासदांच्या बँक खात्यामध्ये २ दिवसांमध्ये वर्ग करीत असल्याचे पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.

अधिक वाचा: ओलम साखर कारखान्याने अखेर चालू गाळपाचा दर केला जाहीर; कसा दिला दर?

English
हिंदी सारांश
Web Title : Someshwar Sugar Factory Announces First Installment for Crushing Season

Web Summary : Someshwar factory declared ₹3,300 per ton as the first installment for sugarcane in the 2025-2026 crushing season. Crushing started November 1st, currently at 10,000 MT daily. To date, 2,04,255 MT crushed with 1,98,100 quintals of sugar produced. The factory targets crushing 14 lakh MT this season.
टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीपुणेमालेगांवबारामतीअजित पवारमहावितरण