lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > साहेब ! रब्बीतही सहा तासच वीज; पिकांना पाणी देणार तरी कसे?

साहेब ! रब्बीतही सहा तासच वीज; पिकांना पाणी देणार तरी कसे?

Sir! Only six hours of electricity even in Rabi; How to water crops? | साहेब ! रब्बीतही सहा तासच वीज; पिकांना पाणी देणार तरी कसे?

साहेब ! रब्बीतही सहा तासच वीज; पिकांना पाणी देणार तरी कसे?

उच्चदाब विद्युत पुरवठा झाला कमी; मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले

उच्चदाब विद्युत पुरवठा झाला कमी; मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले

शेअर :

Join us
Join usNext

खरीप हंगामात वेळोवळी विनंती करून महावितरण कार्यालयाने उच्च दाबाचा वीजपुरवठा केला नाही. आता रब्बी हंगामात तरी महावितरण कंपनी सुरळीत वीजपुरवठा देईल वाटले होते; पण वीजपुरवठा पाच ते सहा तास देत तेही कमी उच्चदाबाने मिळत असल्याने विहिरीवरील विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रबी हंगामातही शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले

सद्य:स्थितीत शेतीसाठी मिळणारा वीजपुरवठा हा कमी व उच्चदाब प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे शेतातील विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रबी हंगामात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने शेतीला आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्याकडे लक्ष दिल्यास शेतकरी सुखी होईल, असे शेतकऱ्यांना वाटते. कमी, जास्त वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

रब्बी पिकांना पाणी देणे अवघड

सध्या वातावरण चांगले असल्यामुळे रबी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, करडई व भाजीपाला आदी पिके बहरली आहेत; परंतु वितरण कंपनीने वीज वाढविण्याऐवजी शेतीचा वीजपुरवठा पाच ते सहा तासांवर आणून ठेवला आहे. अशा परिस्थितीत शेती कशी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.यावर्षी पाऊस कमी झाला असला तरी जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सध्या तरी विहिरींना पाणी चांगले आहे; पण वीजपुरवठा सुरळीत राहत नाही. त्यामुळे रब्बी पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे.

सध्या गहू, हरभरा, ऊस, ज्वारी, केळी, सूर्यफूल आदी पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. मात्र, वीजपुरवठा मधेच कमी व मधेच उच्चदाबाने मिळत आहे. त्यामुळे विहिरीवरील विद्युत मोटारी जळून जात आहेत. जळालेल्या विद्युत मोटारी दुरुस्त करण्यासाठी ४ ते ५ हजार रुपयांचा भुर्दड शेतकऱ्यांना बसतो आहे.

मोटारी दुरुस्तीसाठी येताहेत नाना अडचणी

वेळेवर विद्युत मोटारी दुरुस्त करण्यासाठी मोटार मेकॅनिक मिळत नाही. मेकॅनिक मिळाला तर विद्युत मोटार भरण्यासाठी लागणारे वायर मिळत नाही. या सर्व प्रकारास कमी व उच्चदाब वीजपुरवठा जबाबदार आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्ष कारभारावर शेतकरी रोष व्यक्त करत आहेत.

अधिकारी का दुर्लक्ष करतात हेच तर कळत नाही

तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वितरण कंपनीच्या वरिष्ठांनी वेळीच लक्ष द्यावे. शेतकऱ्यांचा रोष वाढला तर वीज वितरण कंपनी जबाबदार राहणार आहे.- संजय इंगोले, शेतकरी 

रब्बी हंगामात जे झाले ते आम्ही विसरून गेलो आहोत. आता तरी महावितरण कंपनीने लक्ष देणे गरजेचे आहे. लाइनमनने शेतकऱ्यांना वीजपुरवठा वेळेवर द्यावा. वरिष्ठांना वेळोवेळी कळविले पाहिजे.- शेख अब्दुल, शेतकरी

महावितरण कंपनी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी

महावितरण कंपनी खरीप हंगामापासूनच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. रब्बी हंगामापासून महावितरण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कमी, जास्त वीजपुरवठा होत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष दिले जाईल.  - किरण मोरे, ग्रामीण अभियंता, वसमत

Web Title: Sir! Only six hours of electricity even in Rabi; How to water crops?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.