Join us

Singada Crop : शिंगाडा पिकास फळे व भाजीपाला संवर्गातील कृषि पीक म्हणून मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 19:48 IST

singada crop राज्यात पुर्व विदर्भातील शेतकऱ्यांकडून लहान लहान तलाव/बोड्या मध्ये मोठ्या प्रमाणात शिंगाड्याचे उत्पादन घेतले जाते.

singada crop राज्यात पुर्व विदर्भातील शेतकऱ्यांकडून लहान लहान तलाव/बोड्या मध्ये मोठ्या प्रमाणात शिंगाड्याचे उत्पादन घेतले जाते. आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या शिंगाड्यापासून उच्च पोषणमुल्ये असणारे विविध उप पदार्थ बनविले जातात.

पारंपारिक धानशेती सोबत शिंगाडा लागवड केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्यासोबतच ग्रामीण भागातील बेरोजगारीवर देखील मात करता येवू शकते.

तथापि शिंगाडा फळाचा कृषि पिकामध्ये समावेश नसल्याने शिंगाडा उत्पादक शेतकऱ्यांना इतर कृषि पिकांसाठी लागू असलेल्या योजनांचा लाभ होत नाही.

सद्यःस्थितीत पणन विभागाने अधिसूचनेद्वारे 'शिंगाडा' याचा शेती उपजांचे कलम २(१-अ) खालील अनुसूचीमध्ये समावेश केला आहे.

त्याचप्रमाणे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांनी शिंगाडा पीकाचा फळे व भाजीपाला या पीकामध्ये समावेश करण्याचे अभिप्राय संदर्भ क्र. ५ अन्वये दिले आहेत.

या बाबीचा विचार करुन शिंगाड्याला फळे व भाजीपाला संवर्गातील कृषि पिक म्हणून मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

शिंगाडा पिकास 'फळे व भाजीपाला संवर्गातील कृषि पीक' म्हणून मान्यता देण्यात आल्याने शिंगाडा पिकास, इतर कृषि पिकांना अनुज्ञेय असलेल्या लाभ/सवलती प्राप्त होतील.

त्यानुषंगाने सविस्तर मार्गदर्शक सूचना आयुक्त (कृषि) यांच्या स्तरावरुन निर्गमित करण्यात येतील.

अधिक वाचा: शेतजमिनीवर गाळ कसा पसरवायचा? त्याच्या पद्धती कोणत्या? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतीपीकशेतकरीविदर्भशासन निर्णयराज्य सरकारकोकणविद्यापीठभात