Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात नारंगी गाजर खावे की लाल? कोणत्या गाजराचे काय फायदे? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:28 IST

हिवाळ्यात विशेषतः उत्तर भारतातून येणाऱ्या लाल गाजरांमध्ये अँथोसायनिन असल्याने ती रक्तवाढीसाठी आणि हृदयासाठी गुणकारी मानली जातात.

हिवाळ्यात विशेषतः उत्तर भारतातून येणाऱ्या लाल गाजरांमध्ये अँथोसायनिन असल्याने ती रक्तवाढीसाठी आणि हृदयासाठी गुणकारी मानली जातात.

हिवाळ्यात गाजर खाणे आरोग्यासाठी विशेष फायदेशीर मानले जाते. कारण या काळात गाजर ताजे, पौष्टिक आणि शरीराला गरम ठेवणारे असते.

डोळ्यांसाठी 'नारंगी' गाजर◼️ नारंगी गाजरं ही वर्षभर उपलब्ध असतात.◼️ यामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते.◼️ जेव्हा आपण ही गाजरं खातो, तेव्हा आपले शरीर त्याचे रूपांतर 'व्हिटॅमिन ए'मध्ये करते.◼️ हे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.◼️ ही गाजरं चवीला थोडी कमी गोड असल्याने ती सॅलेड, कच्ची खाण्यासाठी उत्तम असतात.

हृदयासाठी 'लाल' गाजर◼️ चव आणि पोषकतेच्या दृष्टीने लाल गाजरं सर्वोत्तम मानली जातात.◼️ या गाजरांचा लाल रंग हा त्यातील लायकोपीन या घटकामुळे असतो.◼️ लायकोपीन हे एक शक्तिशाली अँटी ऑक्सिडंट आहे.◼️ लायकोपीन हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी ठरते.◼️ लाल गाजरं चवीला अधिक गोड आणि रसाळ असतात, त्यामुळेच ती हलवा, ज्यूस करण्यासाठी सर्वाधिक वापरली जातात.

अधिक वाचा: माळरानावर केली फणसाची शेती; वर्षातून सलग आठ महिने उत्पन्न देणाऱ्या थायलंड फणसाचा प्रयोग यशस्वी

English
हिंदी सारांश
Web Title : Red vs. Orange Carrots: Which is Healthier This Winter?

Web Summary : Red carrots, rich in anthocyanins, benefit heart health and blood. Orange carrots, packed with beta-carotene, boost vision and immunity. Choose based on your health needs.
टॅग्स :फळेहिवाळाभाज्याआरोग्यमधुमेहहेल्थ टिप्सअन्न