राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली असून, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी (Shettale Yojana) ऑनलाइन (Online) अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
या अंतर्गत शेततळ्यासाठी आकारानुसार ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान (Subsidy) पात्र लाभार्थीना दिले जाणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची अनिश्चितता आणि अपुरे पाणी यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
काही ठिकाणी सततच्या दुष्काळामुळे पिके जळून जातात, तर काही ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. या समस्येवर उपाय म्हणून शेततळ्यांची उभारणी हा एक महत्त्वाचा पर्याय आहे.
असे मिळते अनुदान
शेततळ्याचे आकारमान | अनुदान |
१५ बाय १५ बाय ३ मी. | २३,८८१ |
२० बाय २० | ३२,०३४ ते ४३,६७८ |
२५ बाय २० | ५५,३२१ |
२५ बाय २५ | ७०,४५५ |
३० बाय २५ | ७०,४५५ |
३० बाय २५ किंवा अधिक | ७५,००० |
अनुदानाची रक्कम
अस्तरीकरणासह | १,५०,००० |
अस्तरीकरणाशिवाय | ७५,००० |
शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांत अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. - डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी बुलढाणा.
या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतावर वैयक्तिक शेततळे बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळवू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीसाठी संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करावी. - मनोजकमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा.
प्रमुख अट काय ?
अर्जदाराकडे किमान एक एकर शेती असावी, शेतकरी यांनी यापूर्वी शासकीय योजनेंतर्गत शेततळ्यासाठी अनुदान घेतलेले नसावे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login#) वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. तसेच, सीएससी केंद्र किंवा वैयक्तिकरीत्या अर्ज करता येईल.
हे ही वाचा सविस्तर : agro advisory : ऊस, हळद पिकासाठी विद्यापीठाने जारी केला कृषी सल्ला वाचा सविस्तर