ओतूर : सध्या शेती करणे म्हणजे जुगार खेळण्याइतकं कठीण बनले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओला पडतो तर कधी कोरडा दुष्काळ येतो.
तरीही प्रत्येक हंगामात शेतकरी नव्या उमेदीने प्रत्येक संकटाला सामोरे जात शेती करत असतो. मात्र, सध्या खरीप हंगामात शेतकरी टोमॅटो, कोबी, फ्लावर, फुले, चवळी, मिरची यांची कापणी करत आहेत.
बाजारभाव खाल्ले असूनही मजुरीचे दर वाढले असून, मजूर कमतरतेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या शेतीसाठी पुरुष मजुरीचा दर ७०० ते ८०० रुपये तर महिला मजुरीचा ५०० ते ५५० रुपये आहे.
बाजारभावाचा ठराव नसल्यामुळे खरीप हंगामात जास्त मजुरी दिल्यावरही मजूर सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे माळशेज परिसरातील सर्व गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य स्वतः शेतीत काम करताना दिसत आहेत.
मजूर कमी उपलब्ध असल्याने शेतीची कामे करण्यात अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. बनकरफाटा या ठिकाणी मजुरांचा ठेका असतो, जिथे विविध गावांचे मजूर येतात. तेथे मजूर स्वतःच आपली रोजी ठरवतात, ज्यामुळे मजुरीचे दर वाढले आहेत.
शेतकरी अडचणीत सापडलेबाजारभावाचा ठराव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. माळशेज परिसरातील घाट माथ्यावरून तसेच कोपरे मांडवे आदिवासी गावातून अकोले तालुक्यातून मजूर येतात आणि तेथेच त्यांना घेऊन शेतीची कामे करावी लागतात. पिकाला बाजारभाव कमी असला तरीही मजुरांना अधिक दर द्यावे लागतात आणि शेती कामे करावी लागतात.
शेतीची कामे वेळेत पूर्ण होईनात◼️ भाव कमी आणि मजुरी जास्त असल्यामुळे काय करावे आणि काय करू नये, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.◼️ कमी पगारात काम करण्यासाठी कुणी तयार नसल्याने शेती कशी करावी, ही गंभीर समस्या उभी आहे. याचा आर्थिक ताण शेवट होऊन तसंच शेतीची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत.◼️ मजुरीचे दर आकाशाला भिडलेले आहेत, परिणामी शेतकरी चिंतेत आहे. वाढीव मजुरी दिल्यानंतरही काही ठिकाणी मजूर यायला तयार नाहीत. खरीप हंगामात मजुरीच्या वाढत्या दरांमुळे शेतकरी हवालदिल झालेले दिसत आहेत.
मजूर कमी; काम जास्तमाळशेज परिसरातील सर्व गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य स्वतः शेतीत काम करताना दिसत आहेत. मजूर कमी उपलब्ध असल्याने शेतीची कामे करण्यात अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या वर्षी मजुरी ४०० रुपये होती, आता सध्याच्या वेळी मजुरी ५५० रुपये झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ३५ टक्के मजुरी वाढली आहे. त्यात भांडवली खर्चही वाढला आहे. सध्या पिकांना बाजारभाव मनासारखे नाहीये. बाजार चांगला असेल तर मजूर घेऊन शेती करणे परवडते, पण आताचे भाव असेच राहिले तर मजूर घेऊन शेती करणे शक्य नाही. - शंकर हाडवळे, शेतकरी
अधिक वाचा: सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रातच; कोणत्या बँकेचे किती कर्ज? जाणून घ्या सविस्तर