Lokmat Agro >शेतशिवार > Sericulture या जिल्ह्यात 'रेशीम'मधून ८३७ शेतकऱ्यांनी वर्षाला कमावले १२ कोटी

Sericulture या जिल्ह्यात 'रेशीम'मधून ८३७ शेतकऱ्यांनी वर्षाला कमावले १२ कोटी

Sericulture 837 farmers of the district earned 12 crores annually from silk | Sericulture या जिल्ह्यात 'रेशीम'मधून ८३७ शेतकऱ्यांनी वर्षाला कमावले १२ कोटी

Sericulture या जिल्ह्यात 'रेशीम'मधून ८३७ शेतकऱ्यांनी वर्षाला कमावले १२ कोटी

पारंपरिक शेतीला फाटा देत जिल्ह्यातील ८३७ शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून त्यातून २०२३-२४ या वर्षात १२ कोटींची कमाई केली आहे. रेशीम निर्मिती करून त्याची प्रतिकिलो ५०० ते ६०० रुपयांनी विक्री केली आहे.

पारंपरिक शेतीला फाटा देत जिल्ह्यातील ८३७ शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून त्यातून २०२३-२४ या वर्षात १२ कोटींची कमाई केली आहे. रेशीम निर्मिती करून त्याची प्रतिकिलो ५०० ते ६०० रुपयांनी विक्री केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : पारंपरिक शेतीला फाटा देत जिल्ह्यातील ८३७ शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून त्यातून २०२३-२४ या वर्षात १२ कोटींची कमाई केली आहे. रेशीम निर्मिती करून त्याची प्रतिकिलो ५०० ते ६०० रुपयांनी विक्री केली आहे.

त्यांना शासनाच्या रेशीम कार्यालयांकडून प्रोत्साहन मिळत असून त्यांना गरजेनुसार अनुदानावर अंडीपुंजाचा पुरवठा केला जात आहे. राज्यातील एकमेव अंडीपुंज निर्मिती केंद्र गडहिंग्लजला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेती करीत आहेत.

सध्या करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यातील ८३७ शेतकऱ्यांनी ८३५ एकर जमिनीवर रेशीम निर्मितीसाठी तुतीच्या वनस्पतीची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांना या वर्षी ३ लाख ४९ हजार ४१० अंडीपुजांचे वितरण शासनाच्या रेशीम कार्यालयाकडून केले आहे.

एक किलोला ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान अंडी पुजांसाठी देण्यात आले आहे. इतके अंडीपुंजा घेऊन ८३७ शेतकऱ्यांनी २ लाख २६ हजार ७०७ रेशीम कोषचे उत्पादन केले. ५०० ते ६०० रुपये किलो दराने खुल्या बाजारात त्याची विक्री केली.

अनुदान मिळण्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्याला जून, जुलै महिन्यात तुतीची लागवड लागेल. त्यानंतर अंडी पुंजापासून रेशीमनिर्मितीसाठी ५० बाय २२ इतका शेड उभारावा लागणार आहे.

त्यानंतर पात्र ठरल्यानंतर अनुदान मिळू शकते, रोजगार हमीचे अनुदान त्या त्या वेळी मजुरांच्या नावे जमा होते. अनुदानासाठी अर्ज रेशीम कार्यालय, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर याठिकाणी करावा.

रेशीम शेतीसाठी मिळणारे अनुदान
सिल्क समग्र योजना ३,७५,०००
रोजगार हमी योजना एक एकरसाठी ४,१८,०००

रेशीम शेतीतून चांगले उत्पन्न मिळते. बाजारपेठही सहज उपलब्ध आहे. रेशीम उत्पादनासाठी अनुदानही मिळते. म्हणून याकडे शेतकऱ्यांनी वळावे. - राजेश कांबळे रेशीम विकास अधिकारी कोल्हापूर

अधिक वाचा: Agro Tourism कृषि पर्यटन केंद्र व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाकडून कसा मिळतो लाभ?

Web Title: Sericulture 837 farmers of the district earned 12 crores annually from silk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.