lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > परभणी कृषी विद्यापीठाच्या ज्वार संशोधन केंद्राकडून ज्वारीच्या सुधारित वाणाचे बियाणे वाटप

परभणी कृषी विद्यापीठाच्या ज्वार संशोधन केंद्राकडून ज्वारीच्या सुधारित वाणाचे बियाणे वाटप

Seed distribution of improved varieties of sorghum by Sorghum Research Center of Parbhani Agricultural University | परभणी कृषी विद्यापीठाच्या ज्वार संशोधन केंद्राकडून ज्वारीच्या सुधारित वाणाचे बियाणे वाटप

परभणी कृषी विद्यापीठाच्या ज्वार संशोधन केंद्राकडून ज्वारीच्या सुधारित वाणाचे बियाणे वाटप

आद्यरेषिय पीक प्रात्यक्षिक योजने अंतर्गत रब्बी ज्वारीचे विविध सुधारित वाणाचे बियाणे दिनांक १३ ऑक्‍टोबर रोजी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

आद्यरेषिय पीक प्रात्यक्षिक योजने अंतर्गत रब्बी ज्वारीचे विविध सुधारित वाणाचे बियाणे दिनांक १३ ऑक्‍टोबर रोजी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

शेअर :

Join us
Join usNext

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठा अंतर्गत अखिल भारतीय ज्वार सुधार प्रकल्प-ज्वार संशोधन केंद्र, परभणी मार्फत आद्यरेषिय पीक प्रात्यक्षिक योजने अंतर्गत रब्बी ज्वारीचे विविध सुधारित वाणाचे बियाणे दिनांक १३ ऑक्‍टोबर रोजी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. विद्यापीठ विकसित रबी ज्‍वारीचे वाण परभणी सुपर मोती, परभणी शक्ती आणि सीएसव्ही-२९ आर बियाणे वाटप करण्यात आले. 

सोबतच बीज प्रक्रियेसाठी गाऊचु, ट्रयकोबुस्ट आणि घडीपुस्तीका वाटप करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन गावातील प्रतिष्ठीत शेतकरी बाळासाहेबजी रेंगे, ज्‍वार पैदासकार डॉ.एल.एन.जावळे, ज्वार रोगशास्त्रज्ञ डॉ.के.डी.नवगीरे, अभासकृषिरत महिला प्रकल्पाच्‍या केंद्र समन्वयक डॉ. सुनिता काळे, सहाय्यक ज्वार कृषिविद्यावेत्ता श्रीमती प्रितम भुतडा आदींची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितीत शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करतांना डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ याविषयी माहिती देऊन ज्वारीची योग्य पध्दतीने लागवड आणि प्रक्रिया उद्योग, प्राथमिक प्रक्रिया, शेतमाल निवड, पॅकेजिंग इ. बाबींचा शेतकऱ्यांना उपयोग करुन जास्तीत जास्त आर्थिक नफा कसा घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ.एल.एन.जावळे यांनी सुधारित वाणांचे वैशिष्टये यावर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना आद्यरेषिय पिक प्रात्यक्षिक चांगल्या पध्दतीने घेण्याचे आव्हान केले. डॉ. सुनिता काळे ह्यांनी यांनी भरडधान्याचे आहारामधील महत्व आणि विविध पदार्थ ह्या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. के.डी.नवगीरे यांनी ज्वारीवर येणारे विविध रोग, बीजप्रक्रिया आणि जैविक निविष्ठांचा वापर याबाबत माहिती दिली.

श्रीमती प्रितम भुतडा यांनी ज्वारीची सुधारित लागवड तंत्रज्ञान लागवड पध्दत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती प्रितम भुतडा यांनी केले. कार्यक्रमास जांब गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसाद देशमुख, बाळासाहेब रेंगे, आणि ज्वार संशोधन केंद्राचे इतर कर्मचारी ह्यांनी प्रयत्न केले.

Web Title: Seed distribution of improved varieties of sorghum by Sorghum Research Center of Parbhani Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.