lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रात ऊस बियाणे विक्री सुरु

पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रात ऊस बियाणे विक्री सुरु

Sale of sugarcane seeds started at Padegaon central sugarcane research center | पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रात ऊस बियाणे विक्री सुरु

पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रात ऊस बियाणे विक्री सुरु

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावच्या मूलभूत ऊस बियाणे विक्रीचा शुभारंभ दि.०९ रोजी करण्यात आला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावच्या मूलभूत ऊस बियाणे विक्रीचा शुभारंभ दि.०९ रोजी करण्यात आला.

शेअर :

Join us
Join usNext

सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात फुले २६५ ने शेतकऱ्यांना छप्पर फाडके पैसे मिळवून दिले होते, त्याचप्रमाणे फुले १५०१२ जातीचा ऊस क्रांती करणार? हे पाहावे लागणार आहे. नुकतीच पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्रातून फुले १५०१२ उस जातीची पहिली मोळी बाहेर पडली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावच्या मूलभूत ऊस बियाणे विक्रीचा शुभारंभ दि.०९ रोजी करण्यात आला. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख, ऊस विशेषज्ञ, डॉ. राजेंद्र भिलारे यांचे हस्ते सतीश काकडे, निंबूत धोंडीबा दाईगुंडे, सोलापूर, अनिल जमदाडे, वाई, नामदेव सकुंडे, वाघळवाडी या प्रगतशील शेतकऱ्यांना फुले ऊस १५०१२ या ऊस वाणाच्या बेणेमळ्यातील पहिली मोळी देऊन बियाणे विक्री व वाटपाला शुभारंभ करण्यात आला.

फुले २६५ या वाणाची अधिक उत्पादन व साखर देणाऱ्या वाणाची लागवड झाल्यामुळे कारखाना ऊस पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण झाला. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमुळे स्वतःच्या बंगला, ट्रॅक्टर यावर २६५ ची कृपा 'असे नावे दिली. डॉ. राजेंद्र भिलारे, ऊस रोगशास्त्रज्ञ डॉ. सुरज नलावडे, ऊस कीटकशास्त्रज्ञ डॉ. शालीग्राम गांगुर्डे, ऊस शरीर क्रियाशास्त्रज्ञ डॉ. कैलास भोईटे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र निगडे, मुख्य शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड आणि ऊस विकास अधिकारी, विराज निंबाळकर, वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. सुरेश उबाळे, डॉ. रणजितसिंह निंबाळकर, डॉ. दत्तात्रय थोरवे उपस्थित होते.

नवीन वाण वापरा
सध्याची पाणी टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता पाडेगाव संशोधन केंद्राने प्रसारित केलेल्या फुले ऊस १५०१२ आणि फुले ऊस १३००७ या पाण्याचा ताण सहन करणारे आणि चोपण जमिनीत अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाची जास्तीत जास्त लागवड करावी. असे आवाहन जगताप यांनी केले. संशोधन केंद्राने प्रसारित केलेले नवीन ऊस वाणाबाबत माहिती देताना डॉ. सुरेश उबाळे यांनी फुले ऊस १५०१२ हा उसाचा वाण को ८६०३२ पेक्षा अधिक ऊस उत्पादन व फुले २६५ पेक्षा अधिक साखर देणारा वाण आहे असे सांगितले.

बियाणे उपलब्ध होणार
सध्या प्रामुख्याने २०२२ साली या संशोधन केंद्राने महाराष्ट्रासाठी शिफारशीत केलेली फुले ऊस १५०१२ आणि राष्ट्रीय स्तरावर द्विकल्पीय उष्णकटीबंधीय प्रदेशामधील ७ राज्यांसाठी प्रसारित झालेली फुले ऊस १३००७ या वाणाचे मोठ्या प्रमाणावर मूलभूत बियाणे मळे केंद्रामार्फत तयार केलेले आहेत. त्याबरोबर को ८६०३२, फुले २६५, फुले १०००१. फुले ९०५७, फुले १२०८२ या वाणाचे बियाणे उपलब्ध होणार आहे. सर्व साखर कारखाने आणि शेतकन्यानी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे बियाणे वापरण्याचे आवाहन डॉ. राजेंद्र भिलारे, ऊस विशेषज्ञ यांनी केले.

Web Title: Sale of sugarcane seeds started at Padegaon central sugarcane research center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.