कोल्हापूर: सततचा पाऊस आणि एकूणच प्रतिकूल हवामानामुळे यंदा देशातील साखर उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे.
आतापर्यंत म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २० लाख ६५ हजार टन साखरेचे उत्पादन घटले आहे.
या हंगामात साखरेचे सुमारे ५० लाख टन उत्पादन कमी होण्याचा अंदाज साखर उद्योगाकडून व्यक्त होत आहे.
या हंगामात ५०७ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. ऊस पिकावर लाल कूज व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.
प्रमुख राज्यातील तुलनात्मक साखर उत्पादन टनमध्ये
राज्य | १५ जानेवारी २०२४ | १५ जानेवारी २०२५ |
उत्तर प्रदेश | ४६.१० लाख | ४२.८५ लाख |
महाराष्ट्र | ५२.८० लाख | ४३.०५ लाख |
कर्नाटक | ३१ लाख | २७.१० लाख |
साखर उताराही घसरलासाखर उताराही घसरला असून, १५ जानेवारीपर्यंत सरासरी उतारा ८.८१ टक्के होता. गेल्या वर्षी तो ९.३७ टक्के होता.
काय सांगते आकडेवारी१५ जानेवारीपर्यंत देशातील साखरेचे उत्पादन १३०.५५ लाख टन झाले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत १५१.२० लाख टन उत्पादन झाले होते. मागील हंगामात ३१९ लाख टन साखर उत्पादन झाले होते, यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन २७० लाख टन राहण्याचा अंदाज आहे.
साखरेचा किमान भाव व इथेनॉल दरवाढीबाबत सरकार निर्णय घेत नसल्याने साखरेचा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने कारखान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. - पी. जी. मेढे, साखर उद्योग अभ्यासक
अधिक वाचा: Kanda Market : ११७५ कोटींचा कांदा विकत देशात हे कांदा मार्केट टॉपवर