Join us

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ३६८ कोटी रुपयांची मदत आली? कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 09:18 IST

राज्यात जून २०२५ मध्ये आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

मुंबई : राज्यात जून २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

या नुकसानीसाठी ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी १४ कोटी ५४ लाख ६४ हजार निधीचा समावेश आहे.

अमरावती विभागासाठी ८६ कोटी २३ लाख ३८ हजार आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी २६८ कोटी ८ लाख ८३ हजार निधीचा समावेश आहे.

जून २०२५ मधील नैसर्गिक आपत्तीजिल्हा - शेतकरी - बाधित क्षेत्र (हे.) - मदत (लाख रु.)छ. संभाजीनगर - १७१ - ७२.३२ - १६.०१हिंगोली - ३,२४७ - १,६११.३७ - ३६०.४५नांदेड - ७,४९८ - ४,७९०.७८ - १,०७६.१९बीड - १०३ - ११ - १.९९अकोला - ६,१३६ - ३,७९०.३१ - ४०५,९०यवतमाळ - १८६ - १३०.५० - २५.४५बुलढाणा - ९०,३८३ - ८७,३९०.०२ - ७,४४५.०३वाशिम - ८,५२७ - ५,१६२.२८ - ४७१.२१

गत सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत झाले शेतीचे नुकसानजिल्हा - शेतकरी - बाधित क्षेत्र (हे.) - मदत (लाख रु.)धाराशिव - ३,२७,९३९ - १,८९,६१०.७० - २६,१४३.३८छ. संभाजीनगर - ७,५४८ - ४,८९१.०५ - ६६५.४१धुळे - १ - ०.३ - ०.०४

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. प्रशासनानेही तातडीने पंचनामे केल्याने बाधित शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. - मकरंद जाधव-पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री

अधिक वाचा: आता प्रत्येक शेताला मिळणार १२ फुटांचा शेतरस्ता; पाणंद रस्त्यांसाठी येणार 'ही' योजना

टॅग्स :शेतीशेतकरीपाऊसविदर्भमराठवाडामराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकराज्य सरकारसरकारपीकपूरमकरंद पाटील