Join us

रब्बी हंगामातील पिक नुकसान भरपाईचे २२ कोटी मंजूर; लवकरच येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:50 IST

pik nuksan bharpai राज्य शासनाने विमा कंपनीला रक्कम दिली असून या आठवडा अखेरला अथवा पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून सांगण्यात आले.

मागील वर्षांतील खरिपाची मंजूर ८२ कोटी इतकी रक्कम या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील तर रब्बी हंगामातील १९ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी इतकी रक्कम मंजूर झाल्याचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून सांगण्यात आले.

मागील वर्षी खरीप २४ साठी २ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी इतकी रक्कम विविध पिकांची नुकसान भरपाई मंजूर आहे. त्यापैकी ७३ हजार ७१८ शेतकऱ्यांची ८२ कोटी इतकी रक्कम जमा करायची राहिली आहे.

ही रक्कम राज्य शासनाने विमा कंपनीला दिली असून या आठवडा अखेरला अथवा पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून सांगण्यात आले.

मागील रब्बी हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यातील ९६ हजार शेतकऱ्यांचे विविध पिकांचे १ लाख ९८ हजार अर्ज आले होते.

यापैकी १८ हजार ४५९ शेतकऱ्यांना २२ कोटी २२ कोटी दोन लाख रुपये मंजूर झाले आहेत. या रक्कमेत व शेतकरी संख्येत आणखीन वाढ होईल असे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमारब्बी हंगामातील मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्यानंतर लगेच खरिपाची रक्कम जमा करण्यात येतील असे सांगण्यात आले. मागील रब्बी हंगामासाठी नैसर्गिक आपत्तीचे १११८ शेतकऱ्यांना २.२६ कोटी, काढणी पश्चात नुकसानीचे २,५७४ शेतकऱ्यांना ५.७१ कोटी तर सरासरी उत्पन्नावर आधारित १४ हजार ७६७ शेतकऱ्यांना १४.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

अधिक वाचा: E Pik Pahani : ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो?

टॅग्स :पीक विमाशेतकरीशेतीपीकसोलापूरपाऊससरकारराज्य सरकारखरीपरब्बी