Join us

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील 'या' २८ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 12:05 IST

Sugarcane FRP शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील २८ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केली आहे.

सोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील २८ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केली असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १५ साखर कारखानदार आहेत.

एक महिन्यावर साखर हंगाम येऊन ठेपला असताना आजही मागील हंगामातील राज्यातील ५४ कारखानदारांनी शेतकऱ्यांना ३०४ कोटींना लटकावले आहे.

बोटावर मोजण्याइतकेच साखर कारखाने उसाला चांगला दर देतात व उसाचे पैसे शेतकऱ्यांना वेळेवर देतात. इतर बहुतेक साखर कारखानदार शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर व वेळेआधी तोडणी करतात.

मात्र, तोडणी केलेल्या उसाचे पैसे देत नाहीत. शेतकरी साखर कारखानदारांच्या दारात, साखर कारखान्यांवर तसेच अधिकाऱ्यांकडे चकरा मारतात. मात्र, साखर कारखानदारांना वेदना होत नाहीत.

शेतकऱ्यांच्या हातात त्रागा करण्यापलीकडे काहीच नाही. मागील हंगामात गाळप घेतलेल्या दोनशेपैकी ५४ साखर कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे ३०४ कोटी रुपये अद्यापही दिले नाहीत.

केवळ मागील हंगामात एफआरपी न देणाऱ्या राज्यातील २८ साखर कारखान्यांची साखर आयुक्तांनी आरआरसी केली आहे. या अठ्ठावीसमध्ये सोलापूर जिल्ह्यातील १५ व सोलापूर प्रादेशिक विभागातील धाराशिव जिल्ह्यातील एका साखर कारखान्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजही ४२ कोटी थकीत..◼️ सोलापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांकडे एफआरपीप्रमाणे ४२ कोटी १६ लाख रुपये थकले आहेत.◼️ सिद्धेश्वर सोलापूर सर्वाधिक १८ कोटी तर भीमा सहकारी टाकळी सिकंदर, गोकुळ शुगर, जयहिंद शुगर आचेगाव, सहकार शिरोमणी वसंतराव काळे, मातोश्री लक्ष्मी शुगर, इंद्रेश्वर शुगर, सिद्धनाथ शुगर तिर्हे या आठ साखर कारखान्यांकडे ऑगस्ट अखेरपर्यंत ४२ कोटी १६ लाख रुपये थकबाकी आहे. धाराशिव जिल्ह्यातील एकही कारखाना थकीत नाही.

'आरआरसी' कारवाई झालेले कारखाने१) मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट२) गोकुळ शुगर धोत्री३) लोकमंगल, बीबीदारफळ४) लोकमंगल, भंडारकवठे५) जय हिंद शुगर, आचेगाव६) श्री संत दामाजी, मंगळवेढा७) सिद्धनाथ शुगर, तिर्हे८) इंद्रेश्वर शुगर, बार्शी९) धाराशिव शुगर, सांगोला१०) सहकार शिरोमणी वसंतराव काळे, पंढरपूर११) सिद्धेश्वर, सोलापूर१२) अवताडे शुगर, मंगळवेढा१३) भैरवनाथ शुगर, आलेगाव१४) भैरवनाथ शुगर, लवंगी१५) भीमा सहकारी१६) भीमाशंकर, वाशी (धाराशिव)१७) स्वामी समर्थ शुगर, नेवासा१८) गजानन महाराज शुगर, संगमनेर१९) गंगामाई इंडस्ट्रीज, शेवगाव२०) केदारेश्वर सहकारी, शेवगाव२१) खंडाळा तालुका शेतकरी साखर कारखाना, सातारा२२) किसनवीर सातारा सहकारी२३) सचिन घायाळ शुगर छत्रपती, संभाजीनगर२४) जय महेश माजलगाव, बीड२५) कर्मयोगी शंकरराव पाटील, इंदापूर२६) समृद्धी शुगर, घनसांगवी२७) डेक्कन शुगर, यवतमाळ२८) पैनगंगा साखर कारखाना, बुलढाणा

अधिक वाचा: आता पीएम किसानचा हप्ता मिळणार फक्त शेतकऱ्याच्या पत्नीला; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीसरकारराज्य सरकारसोलापूरधाराशिवशेवगावसंगमनेरनेवासाशेतीबुलडाणाआयुक्तपुणे