lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > लसणाच्या नियमित सेवनाने कॅन्सर अन् मधूमेह होईल दूर

लसणाच्या नियमित सेवनाने कॅन्सर अन् मधूमेह होईल दूर

Regular consumption of garlic will remove cancer and diabetes | लसणाच्या नियमित सेवनाने कॅन्सर अन् मधूमेह होईल दूर

लसणाच्या नियमित सेवनाने कॅन्सर अन् मधूमेह होईल दूर

कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण घटते, तसेच लसणात बी आणि सी या जीवनसत्त्वाचे प्रमाण असते. कच्चा लसूण बेचव लागत असल्यास, अशक्य झाल्यास लसूण भाजून देखील सेवन करता येतो.

कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण घटते, तसेच लसणात बी आणि सी या जीवनसत्त्वाचे प्रमाण असते. कच्चा लसूण बेचव लागत असल्यास, अशक्य झाल्यास लसूण भाजून देखील सेवन करता येतो.

शेअर :

Join us
Join usNext

आपल्या शरीरकरीता आवश्यक असणार्‍या बी आणि सी जीवनसत्त्वांनी युक्त असलेल्या कच्च्या लसणाचा आहारात समावेश असणे अत्यावश्यक आहे. उपाशीपोटी एक ग्लास पाण्यासोबत कच्च्या लसणाच्या चार पाकळ्या नियमित घेतल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, तसेच कच्चा लसूण खाल्ल्यास कर्क रोगापासून बचाव होतो. लठ्ठ, व्याधीग्रस्त रुग्णांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास त्यांना याचा चांगला फायदा होईल, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

लसूण मधुमेहासाठी औषध

कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण घटते, तसेच लसणात बी आणि सी या जीवनसत्त्वाचे प्रमाण असते. कच्चा लसूण बेचव लागत असल्यास, अशक्य झाल्यास लसूण भाजून देखील सेवन करता येतो. यामुळे मधुमेहग्रस्त रुग्णांनी नियमित उपाशीपोटी कच्च्या लसणाच्या चार पाकळ्या खाव्या, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत.

कोलेस्टेरॉलची समस्या आहे का?

सध्या चायनीज खाण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच मांसाहारदेखील वाढला आहे. मात्र, यामुळे कोलेस्टेरॉलची समस्या जाणवत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ज्या व्यक्तींना कोलेस्टेरॉलची समस्या आहे, त्यांच्यासाठी कच्चा लसूण उत्तम उपाय आहे. यामुळे नसांमध्ये ब्लॉकची समस्या नाहीशी होऊन रक्ताभिसरण होण्याला मदत होते. कोलेस्टेरॉलची समस्या असणाऱ्यांनी आवर्जून हा प्रयोग करून बघावा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

असे करा कच्च्या लसणाचे सेवन

अनेक जण लसूण शिजवून खाण्याचा सल्ला देतात. मात्र, यामुळे लसणातील एलिसिन नावाचा घटक कमी होतो, जो आवश्यक आहे. उपाशीपोटी ४-५ कच्च्या लसणाच्या पाकळ्या सोलून खाव्या. कच्चा लसूण खाणे शक्य न झाल्यास भाजून खाल्ल्यास देखील याचा फायदा होत असल्याचे आहारतज्ज्ञ सांगत आहेत.

Web Title: Regular consumption of garlic will remove cancer and diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.