Join us

गहू, हरभरा, मक्याच्या सर्वाधिक लागवडीसह राज्यातील रब्बी पेरणीचे क्षेत्र आठ लाख हेक्टरवर पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 09:50 IST

राज्यात आतापर्यंत सुमारे आठ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या २६ टक्क्यांपर्यंत झाली आहे, तर गव्हाची पेरणी केवळ तीन टक्के झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गहू, हरभरा आणि मक्याचे क्षेत्र वाढेल.

राज्यात आतापर्यंत सुमारे आठ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, ज्वारीचीपेरणी सरासरी क्षेत्राच्या २६ टक्क्यांपर्यंत झाली आहे, तर गव्हाची पेरणी केवळ तीन टक्के झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गहू, हरभरा आणि मक्याचे क्षेत्र वाढेल.

या हंगामासाठी सरासरी क्षेत्राच्या किमान आठ लाख हेक्टर क्षेत्रावर अधिक पिकांची लागवड होईल असा अंदाज आहे, अशी माहिती कृषी संचालक रफीक नाईकवडी यांनी दिली. राज्यात ५७ लाख ८० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली जाते.

त्यापैकी सर्वाधिक २५ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या हरभरा पिकाचे आहे. त्यानंतर रब्बी ज्वारीचे क्षेत्र १४ लाख ९५ हजार हेक्टर इतके आहे, तर गव्हाखालील क्षेत्र ११ लाख ८० हजार हेक्टर आहे. राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे विहिरी, तलाव, धरणे यांत पाण्याची उपलब्धता तुडुंब असल्याने क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

त्याबाबत कृषी विभागाचे विस्तार संचालक रफीक नाईकवडी म्हणाले, राज्यात सरासरी ५७लाख ८० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होत असली तरी यंदा पाण्याची उपलब्धता चांगली आहे. त्यामुळे हे क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत जाईल अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

पीकनिहाय पेरणी (क्षेत्र हेक्टर मध्ये)

गहू - ३१,६५७ मका - ८८,३३४ हरभरा - २,७२,८४९ ज्वारी - ३,९३,४०१ 

विभागनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर)

कोकण -  १,२२३नाशिक -  ३४,९९६पुणे - २,३१,६१५कोल्हापूर - १,७३,६१०संभाजीनगर - ५६,१३४लातूर -  २,५१,१४१अमरावती - ४१,२७१नागपूर - ५,८८१एकूण : ७९५,८७२ हेक्टर. 

१४ लाख टन बियाणे उपलब्ध करून देण्यात आले

• अकरा लाख टन सरासरी बियाण्यांची गरज असते; प्रत्यक्षात १४ लाख टन बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. खतांची सरासरी आवश्यकता २५ लाख टन असते आणि यंदा ३१ लाख टन खते उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

• क्षेत्र वाढ ही मुख्यत्वे गहू, हरभरा आणि मका या पिकांत होण्याची शक्यता आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने गव्हाच्या क्षेत्रात वाढ होईल. हरभरा पिकातही वाढ अपेक्षित आहे, असे कृषी विभागाने सांगितले.

हेही वाचा : पाणंद रस्त्यांचा मिटलेला वाद आता पुन्हा उद्भवणार नाही! स्थळ पंचनामा आणि जिओ टॅग फोटो बंधनकारक

English
हिंदी सारांश
Web Title : Rabi sowing area in Maharashtra reaches 8 lakh hectares.

Web Summary : Rabi sowing in Maharashtra covers 8 lakh hectares, led by gram, jowar, and maize. Increased water availability boosts prospects for wheat, gram, and maize cultivation, potentially exceeding 65 lakh hectares.
टॅग्स :रब्बी हंगामपीकपेरणीशेतीशेतकरीशेती क्षेत्रमराठवाडाविदर्भमकागहूज्वारी