Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यावर साचले कंबरेएवढे पाणी

Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यावर साचले कंबरेएवढे पाणी

Pune heavy Rain Water on the road monsoon farmer crop kharip season | Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यावर साचले कंबरेएवढे पाणी

Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यावर साचले कंबरेएवढे पाणी

घाट परिसरातील शेतकऱ्यांना भाताचे रोप टाकण्यासाठी चांगली सोय झाली आहे. 

घाट परिसरातील शेतकऱ्यांना भाताचे रोप टाकण्यासाठी चांगली सोय झाली आहे. 

पुणे : मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून आज पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपले आहे. आज दुपारनंतर पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. तर घाट परिसरातील शेतकऱ्यांना भाताचे रोप टाकण्यासाठी चांगली सोय झाली आहे. 

दरम्यान, आज मागच्या तीन ते चार दिवसांपासून पुण्यात पावसाचे वातावरण असून पाराही कमी झाला आहे. तर आज दुपारी ४ वाजता सुरू झालेला पाऊस रात्रीपर्यंत सुरू होता. पुणे शहर आणि उपनगर भागांत पावसाने चांगलेच झोडपले असून यामुळे रस्त्यावर पाणी आले आहे. 

कंबरेएवढे साचले पाणी
अचानक आलेल्या पावसामुळे पुण्यातील रस्त्यावर पाणी आले असून वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पावसाच्या पाण्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली आहे. अनेक भागांत कंबरेएवढे पाणी साचल्यामुळे नागरिकांना पायीसुद्धा चालता येत नव्हते.  

शेतकऱ्यांना फायदा
मान्सूनचा पाऊस राज्यभर पडण्यास सुरूवात झाली असून शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा होणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या  घाट परिसरात भातशेतीसाठी या पावसाचा फायदा होत आहे.

Web Title: Pune heavy Rain Water on the road monsoon farmer crop kharip season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.