Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता जारी; केंद्र सरकारचे 'या' चार योजनांसाठी महत्त्वाचे निर्णय

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता जारी; केंद्र सरकारचे 'या' चार योजनांसाठी महत्त्वाचे निर्णय

Prime Minister Kisan Samman Nidhi installment released; Central government's important decisions for 'these' four schemes | प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता जारी; केंद्र सरकारचे 'या' चार योजनांसाठी महत्त्वाचे निर्णय

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता जारी; केंद्र सरकारचे 'या' चार योजनांसाठी महत्त्वाचे निर्णय

PM Kisan Hapta पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवीन पीएमओ सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनांचे उद्घाटन केल्यानंतर काही तासांतच स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता जारी केला.

PM Kisan Hapta पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवीन पीएमओ सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनांचे उद्घाटन केल्यानंतर काही तासांतच स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता जारी केला.

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवीन पीएमओ सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनांचे उद्घाटन केल्यानंतर काही तासांतच स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता जारी केला.

तसेच महिलांसाठी काही महत्त्वाच्या योजनांना मान्यता दिली. या निर्णयांमुळे देशातील कोट्यवधी नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे.

राष्ट्रपती भवनातील प्रांगणात आयोजित कार्यक्रमानंतर पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ), केंद्रीय सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय येथेही त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला.

घेतलेले महत्त्वाचे निर्णय
◼️ पीएम स्वनिधी योजनेला मुदतवाढ.
◼️ 'लखपती दीदी' कार्यक्रमाला चालना.
◼️ कृषी अवसंरचना निधीचा विस्तार.
◼️ स्टार्टअप इंडिया फंड २ ला मंजुरी.

'सेवा तीर्थ'मध्ये घेतले जाणारे निर्णय जनतेच्या आकांक्षांना गती देतील
◼️ पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक या ऐतिहासिक इमारती ब्रिटीश राजवटीच्या आदर्शाना मूर्त रूप देण्यासाठी बांधल्या गेल्या होत्या.
◼️ तिथे घेतलेले निर्णय सम्राटाची इच्छा दर्शवत असत. मात्र, 'सेवा तीर्थ'मध्ये घेतले जाणारे निर्णय जनतेच्या आकांक्षांना गती देतील.
◼️ पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि केंद्रीय सचिवालयाच्या नवीन इमारती सेवा तीर्थ व कर्तव्य भवन १ व २ या 'विकसित भारत'च्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आहेत.
◼️ या इमारती जनताकेंद्रित राज्यकारभार, राष्ट्रीय प्रगतीच्या सरकारच्या बांधिलकीचे प्रतीक आहेत.
◼️ साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक यासारख्या इमारती आतापर्यंत संरक्षण, गृह, वित्त यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांसाठी आणि पीएमओसाठी वापरल्या जात.
◼️ सेवा तीर्थ, कर्तव्य भवन या इमारती देशातील आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बांधण्यात आल्या आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी एका विशेष स्मारक टपालाचे आणि नाण्याचेही अनावरण केले.

येथे घेतले जाणारे निर्णय कोणत्याही सम्राटाच्या इच्छेचे प्रतिबिंब नसून १४० कोटी नागरिकांच्या आकांक्षांना पुढे नेणारी पायाभरणी ठरतील. याच भावनेतून मी सेवा तीर्थ व कर्तव्य भवन जनतेला समर्पित करतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अधिक वाचा: पाणंद रस्ता कामांवर असलेली दहा कामांची मर्यादा केंद्र सरकार हटवणार; पाणंद रस्त्यांना गती येणार

Web Title : प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की किस्त जारी; केंद्र सरकार के चार योजनाओं पर अहम फैसले

Web Summary : प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की किस्त जारी, पीएम मोदी ने नई इमारतों का उद्घाटन किया। पीएम स्वनिधि योजना का विस्तार, 'लखपति दीदी' कार्यक्रम को बढ़ावा, कृषि अवसंरचना कोष का विस्तार और स्टार्टअप इंडिया फंड 2 को मंजूरी, करोड़ों नागरिकों को लाभ।

Web Title : PM Kisan Samman Nidhi Installment Released; Key Decisions on Four Schemes

Web Summary : PM Kisan Samman Nidhi installment released after PM Modi inaugurated new buildings. Key decisions include extending PM Svanidhi Yojana, promoting 'Lakhpati Didi' program, expanding agricultural infrastructure fund, and approving Startup India Fund 2, benefiting crores of citizens.