lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > Police Bharti; सराव चालू आहे भरती व्हायचंय.. राज्यात १७,४७१ पदांसाठी होणार पोलिस भरती

Police Bharti; सराव चालू आहे भरती व्हायचंय.. राज्यात १७,४७१ पदांसाठी होणार पोलिस भरती

Police Bharti; Practicing is going on Want to be recruited.. Police recruitment will be held for 17,471 posts in the state | Police Bharti; सराव चालू आहे भरती व्हायचंय.. राज्यात १७,४७१ पदांसाठी होणार पोलिस भरती

Police Bharti; सराव चालू आहे भरती व्हायचंय.. राज्यात १७,४७१ पदांसाठी होणार पोलिस भरती

महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये १७,४७१ पदांच्या पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३१ मार्चपर्यंत ज्या जिल्ह्यासाठी परीक्षा द्यायची आहे त्या जिल्ह्याच्या पोलिस विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये १७,४७१ पदांच्या पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३१ मार्चपर्यंत ज्या जिल्ह्यासाठी परीक्षा द्यायची आहे त्या जिल्ह्याच्या पोलिस विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये १७,४७१ पदांच्या पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३१ मार्चपर्यंत ज्या जिल्ह्यासाठी परीक्षा द्यायची आहे त्या जिल्ह्याच्या पोलिस विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

राज्यात ११ पोलिस आयुक्तालय व ३६ जिल्हा पोलिस दल आहेत. पोलिस हवालदार ९५९५ पदे, पोलिस कॉन्स्टेबल बँड्समन ४१ पदे, सशस्त्र पोलिस हवालदार ४३४९ पदे, तुरुंग हवालदार १८०० पदे, पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर १६८६ पदे अशा एकूण १७,४७१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्यात शारीरिक चाचणी व दुसऱ्या टप्यात लेखी चाचणी घेण्यात येईल. पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार असून ५० गुणांपैकी किमान ५० टक्के गुण बंधनकारक आहेत.

सर्व पोलिस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेतील गुणांवरून गुणवत्तायादी तयार होईल. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा पोरांचा सराव सुरु आहे. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

पोलिस शिपाई पदासाठी १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असतो.
गणित २५ प्रश्न (२५ गुण)
सामान्यज्ञान २५ प्रश्न (२५ गुण)
मराठी २५ प्रश्न (२५ गुण)
बुद्धिमत्ता चाचणी २५ प्रश्न (२५ गुण)

कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश
(अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी : २५ गुण
(ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी : २५ गुण

लेखी चाचणी
अंकगणित २० प्रश्न (२० गुण)
सामान्यज्ञान व चालू घडामोडी २० प्रश्न (२० गुण)
बुद्धिमत्ता चाचणी २० प्रश्न (२० गुण)
मराठी व्याकरण आणि २० प्रश्न (२० गुण)
मोटार वाहन चालविणे/वाहतुकीबाबतचे नियम २० प्रश्न (२० गुण) असे एकूण १०० प्रश्न
१०० गुणांची परीक्षा; कालावधी ९० मिनिटे असेल.

पात्रता निकष
- पोलिस शिपाई या पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा किमान १८ वर्षे व कमाल २८ वर्षे आहे, तर मागास प्रवर्गास कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे आहे.
- पोलिस शिपाई पदासाठी शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण आहे.
- पोलिस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांसाठी उंची किमान १६५ सेंटिमीटर तर महिला उमेदवारांसाठी उंची किमान १५८ सेमी आहे.
- पुरुष उमेदवारांसाठी छाती किमान ७९ सेंटिमीटर असली पाहिजे, तर फुगवून किमान ८४ सेंटिमीटर असली पाहिजे.

शारीरिक चाचणी आणि त्याचे गुण
पुरुष उमेदवारांसाठी

१६०० मीटर धावणे (२० गुण)
१०० मीटर धावणे (१५ गुण)
गोळाफेक (१५ गुण)
महिला उमेदवारांसाठी 
८०० मीटर धावणे (२० गुण)
१०० मीटर धावणे (१५ गुण)
गोळाफेक (१५ गुण) यांचा समावेश असतो.

शारीरिक चाचणीतील गुणानुक्रमे एकूण पदसंख्येच्या १० पट उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविले जाते.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रा. राजेंद्र चिंचोले
स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक

Web Title: Police Bharti; Practicing is going on Want to be recruited.. Police recruitment will be held for 17,471 posts in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.