Lokmat Agro >शेतशिवार > PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेसंदर्भात तुम्हाला नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेसंदर्भात तुम्हाला नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या

PM Kisan Yojana: Let's get answers to frequently asked questions about PM Kisan Yojana | PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेसंदर्भात तुम्हाला नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेसंदर्भात तुम्हाला नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या

pm kisan yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ

pm kisan yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ

शेअर :

Join us
Join usNext

लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (pm kisan yojana) १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.  पीएम किसान योजनेचे पैसे मिळविण्यासाठी जर बँक खाते बदलाचे असेल, तर काय करायचे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो. त्यासाठीची प्रक्रिया समजावून घेऊ.

कुणाला मिळतो लाभ 
पीएम किसान सन्मान निधी योजना सुरूवातीला फक्त २ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, परंतु आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आता या योजनेचा लाभ जमीन असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र ही जमीन अर्जदाराच्या नावावर १ जानेवारी २०१९ पूर्वी नोंदणीकृत असावी. याशिवाय, अर्जदाराचे बँक खाते, आधार कार्ड आणि NPCI शी लिंक असणे अनिवार्य आहे.

 बँक खाते अपडेट कसे करतात?

  1. पीएम किसान योजनेतील नवीन बँक खाते क्रमांक अपडेट करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
  2. यानंतर तुम्हाला 'अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर्स' या पर्यायावर जावे लागेल. हा पर्याय तुम्हाला होम पेजवरच दिसेल.
  3. यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि 'डेटा मिळवा' या पर्यायावर जा.
  4. क्लिक केल्यानंतर, तुमचे सर्व तपशील तुमच्या समोर असतील.
  5. येथे तुम्ही संपादन वर क्लिक करून तुमचे बँक खाते अपडेट करू शकता.


कुणाच्या खात्यावर पैसे येत नाहीत?

  • शेतकऱ्यांकडे स्वत:ची जमीन नसेल तर
  • कुटुंबातील एकच सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • जर वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर
  • कुटुंबात सरकारी कर्मचारी किंवा अनिवासी भारतीय असले तर
  • कुटुंबातील कोणत्याही सदस्याला दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल तर 
  • कुटुंबातील कोणताही सदस्य डॉक्टर, सीए किंवा वकील असल्यास
  • पैसे का जमा होत नाहीत?
  • ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खात्याला आधार लिंक केले नाही, ईकेवायसी केले नाही, काही कारणास्तव खाते बंद पडलेले आहे किंवा नोंदणी करण्याची प्रोसेस पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. 
     

पैसे खात्यावर येण्यासाठी काय कराल?
ज्या शेतकऱ्यांची ईकेवायसी करायची राहिली असेल अशा शेतकऱ्यांनी ईकेवायसी, आधार लिंक आणि बँक खाते सुरू आहे का याची खात्री करून घ्यावी. जरी १६वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नसेल तरी ईकेवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांना हे पैसे पुढच्या हप्त्यावेळी किंवा त्याआधी वितरीत करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरून जाण्याचे किंवा चिंता करण्याचे कारण नाही.

तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे कसे तपासावे? 
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला pmkisan.gov.in भेट द्या.
मुख्यपृष्ठावर लाभार्थी स्थिती या टॅबवर क्लिक करा
यामध्ये आधार क्रमांक, खाते क्रमांक व मोबाइल नंबर टाकावा लागेल.
निवडलेल्या पर्यायावर डेटा मिळवा या टॅबवर क्लिक करा
लाभार्थी डेटा पाहण्यास पात्र ठरतील

Web Title: PM Kisan Yojana: Let's get answers to frequently asked questions about PM Kisan Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.