Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > PM Kisan Yojana : 'नमो शेतकरी महासन्मान निधी'चे २ हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

PM Kisan Yojana : 'नमो शेतकरी महासन्मान निधी'चे २ हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

PM Kisan Yojana: Deposit of 2 thousand rupees of 'Namo Shetkari Mahasanman Nidhi' in farmers' accounts | PM Kisan Yojana : 'नमो शेतकरी महासन्मान निधी'चे २ हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

PM Kisan Yojana : 'नमो शेतकरी महासन्मान निधी'चे २ हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

PM Kisan Yojana : राज्य सरकारने निधी वितरण्यास मान्यता दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे.

PM Kisan Yojana : राज्य सरकारने निधी वितरण्यास मान्यता दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे.

PM Kisan Yojana : केंद्र सरकराच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात सुरूवात करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळतो.

दरम्यान, राज्य सरकारने मागच्या एका वर्षापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली. त्याद्वारे पीएम किसान योजनेद्वारे जसे प्रतीवर्षी ६ हजार रूपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे, त्याप्रमाणे राज्य सरकारनेही त्यामध्ये भर घालून ६ हजार रूपये देण्याची घोषणा केली. या योजनेचे आत्तापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. 

राज्य सरकाने या योजनेद्वारे आत्तापर्यंत तीन हप्त्यापोटी ५ हजार ५९२ कोटी रूपये खर्च केले आहेत. तर चौथ्या हप्त्यासाठी सरकारने २ हजार ४१ कोटी रूपये खर्च केले असून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. 

लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, पीएम किसान योजना अशा योजना लागू करून सरकार शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आळशी बनवण्याचं काम करतंय, पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा जास्त विमा कंपन्यांना होतोय असा आरोप शेतकरी करत आहेत. तर या योजनेतून शेतकऱ्यांना तटपुंजी रक्कम देण्यापेक्षा शेतमालाला हमीभाव द्या अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Web Title: PM Kisan Yojana: Deposit of 2 thousand rupees of 'Namo Shetkari Mahasanman Nidhi' in farmers' accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.