Join us

पडीक जमिनीवर औषधी वृक्षांची लागवड करून शेतीला लावा आर्थिक हातभार सोबत अनुदानही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 17:16 IST

Agriculture Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागातील बेरोजगार मजुरांना रोजगार मिळवून देणारी महत्वाची योजना आहे. या योजनेतून आता शेतजमिनी, बांध किंवा पडीक जमिनीवर औषधी वृक्ष तसेच फुलपिकांची लागवड केली जाणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागातील बेरोजगार मजुरांना रोजगार मिळवून देणारी महत्वाची योजना आहे. या योजनेतून आता शेतजमिनी, बांध किंवा पडीक जमिनीवर औषधी वृक्ष तसेच फुलपिकांची लागवड केली जाणार आहे. 

या उपक्रमामुळे शेतीला पूरक उत्पन्न मिळणार असून पर्यावरण संवर्धनासही हातभार लागणार आहे. या योजनेच्या अटी व शर्ती ठरवलेल्या गेल्या असून त्यानुसार लागवडीनंतर देखभाल व संरक्षणासाठी शासनामार्फत अनुदान देखील देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत पडीक जमिनीचा उपयोग होऊन त्या उत्पादक होतील तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

वनशेतीसाठी पडीक जमिनीचा वापर

वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी. यामध्ये माळरान व टेकड्या, शेतरस्त्याचा काठ, मध्यम व उथळ खोलीची जमीन, नाल्याच्या किनाऱ्यांवर वनवृक्षांची लागवड केली जाते.

किती अनुदान ?

औषधी वृक्ष लागवडीसाठी शासनाकडून विविध योजनेंतर्गत अनुदान दिले जाते. या अनुदानात लागवड खर्चाच्या ५० ते ७० टक्क्यांपर्यंतचे अनुदान मिळू शकते, हे निवडलेल्या वनस्पतीच्या प्रकारावर अवलंबून असते.

कोणत्या वनस्पतींची लागवड करता येणार ?

३० टक्के अनुदान : यामध्ये सुमारे ४७प्रकारच्या औषधी वनस्पती घेता येतात. यामधील प्रमुख प्रजाती कोरफड, दवणा, शतावरी, कडूलिंब, सफेद मुसळी, दालचिनी, तमालपत्र, आवळा, कोकम, तुळस, स्टिविया, अर्जुन, बेहडा, हिरडा, गुळवेल, निर्गुडी आणि अश्वगंधा इ.

५० टक्के अनुदान : यामध्ये सुमारे १७प्रकारच्या औषधी वनस्पती असून, यामध्ये बेल, शिरीष, सप्तपर्णी, कळलावी, जेष्ठमध, शिवण, बिजसल, सर्पगंधा, सीता-अशोक, पाडळ आणि पिठवण यासारख्या प्रजाती आहेत.

७० टक्के अनुदान : यामध्ये ४ प्रकारच्या औषधी वनस्पती (गुग्गुल, टेटू, रक्त चंदन आणि चंदन) असून, त्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान मिळते.

फूल पिकाचेही सोने होणार

पडीक जमिनीवर गुलाब, झेंडू, शेवंती, मोगरा आदी प्रकारचे फुलपीक घेता येईल. पावसाळ्यात पडीक जमिनीवर हे पीक घेता येईल.

लाभ कोण घेऊ शकणार ?

• पडीक जमिनीवर औषधी वनस्पती लागवड योजनेत शेतकरी, औषधी उत्पादक संघ, स्वयंसहायता गट, कंपनी, सहकारी संस्था किंवा संशोधन संस्था लाभ घेऊ शकतील. क्षेत्र मर्यादा किमान १ हेक्टर ते कमाल २ हेक्टर क्षेत्रास तीन वर्षातून एकदा लाभ मिळू शकतो.

• या लागवडीमुळे जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते. कृषी वनशेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीक उत्पादनाबरोबर वृक्षांपासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो.

हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

टॅग्स :कृषी योजनाशेतकरीशेतीजंगलसरकारी योजनाशेती क्षेत्र