Lokmat Agro >शेतशिवार > Pik Vima Yojana 2025 : पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी उद्या शेवटचा दिवस?

Pik Vima Yojana 2025 : पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी उद्या शेवटचा दिवस?

Pik Vima Yojana 2025 : Is tomorrow the last day to participate in the crop insurance scheme? | Pik Vima Yojana 2025 : पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी उद्या शेवटचा दिवस?

Pik Vima Yojana 2025 : पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी उद्या शेवटचा दिवस?

pik vima yojana 2025 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.

pik vima yojana 2025 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.

शेअर :

Join us
Join usNext

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.

राज्यात विविध जिल्ह्यात विविध कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तूर, मका, कांदा या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल.

अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेतलेले सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई-पीक पाहणी बंधनकारक आहे.

कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक, सात-बारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज भरून सहभागी व्हावे.

अधिक वाचा: माती तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी मिळतंय दीड लाखाचे अर्थसहाय्य; कुठे कराल अर्ज?

Web Title: Pik Vima Yojana 2025 : Is tomorrow the last day to participate in the crop insurance scheme?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.