Join us

Paddy Registration : धान खरेदी नोंदणीला 'ही' कागदपत्रे आवश्यक, नोंदणी कशी करतात? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 14:02 IST

Bhat Kharedi Nondni : भात खरेदी केंद्रावर नोंदणी निशुल्क आहे. नोंदणी कशी केली जात आहे, काय-काय कागदपत्रे लागतात, ते पाहुयात... 

Paddy Registration : आता धान खरेदी केंद्रे (paddy Buying Center) सुरु झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांची नोंदणी देखील सुरु झाली आहे. कारण ज्या शेतकऱ्यांना आधारभूत किंमत योजनेंतर्गत धान विक्री करायची आहे, अशा शेतकऱ्यांना नोंदणी करणे (Bhat Kharedi Nondni) बंधनकारक आहे.

नाशिक जिल्ह्यातही (Nashik District) आदिवासी विकास मंडळाकडून (Aadiwasi Vikas Mahamandal) नोंदणी सुरु आहे. १ नोव्हेंबर पासून नोंदणीला सुरवात झाली असून १५ डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत आहे. या कालावधीत शेतकरी रीतसर खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकतात. शिवाय हि नोंदणी निशुल्क आहे. नोंदणी कशी केली जात आहे, काय-काय कागदपत्रे लागतात, ते पाहुयात... 

कोणती कागदपत्रे आवश्यक 

आधार कार्डसातबारा (अपडेटेड)बँकेचे पासबुक 

कशी केली जातेय नोंदणी 

  • शेतकऱ्यांनी दिलेली कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर जायचे आहे. 
  • या ठिकाणी आदिवासी विभाग विभागाकडून कर्मचारी उपलब्ध आहेत. 
  • https://www.neml.in/home या वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणी केली जात आहे. 
  • अर्ज नोंदणी ते कर्मचारी करून घेत असतात. 
  • यात आधार वेरीफिकेशन, बँक व्हेरिफिकेशन थंब द्वारे केले जाते. 
  • अशा पद्धतीने नोंदणी केली जात आहे. 

 

१ नोव्हेंबरपासून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात जवळपास १२०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे बिगर आदिवासी क्षेत्रात मार्केटिंग फेडेरेशन काम करते, तर आदिवासी क्षेत्रात आदिवासी विकास विभाग काम करत आहेत. 

हेही वाचा : Paddy Buying Centre : नाशिक जिल्ह्यातील भात खरेदी केंद्राची संपूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर 

टॅग्स :भातकृषी योजनाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिक