गजानन मोहोड
अमरावती : कृषी विभागाने सील केलेले खत विक्री व साठवणुकीचा परवाना नसलेल्या व्यक्तिद्वारा यापूर्वी काही संत्रा उत्पादकांच्या थेट शेतात पोहोचविण्यात आलेले आहे.
याचे फोटोदेखील सदर विक्रेत्याने समाजमाध्यमावर (Social Media) व्हायरल केले व स्वतः स्टेटसवर ठेवले होते, त्यामुळे संत्रा उत्पादकांची (Orange Growers) फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांनी (Farmer) सांगितले.
कृषी विभागाच्या चार अधिकाऱ्यांनी मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथील घरातून ८ जानेवारीला ६०० बॅग साठा सील केला व दोन नमुने काढून येथील प्रयोगशाळेला ८ जानेवारीला पाठविण्यात आले.
पावडर बॅगमधील नमूना अप्रमाणित आला आहे. अशा ५०० बॅग आहेत. प्रकरणी मोर्शी ठाण्यात २२ जानेवारीला रात्री उशिरा गुन्हे नोंदविण्यात आला आहे. समाजमाध्यमांद्वारे जाहिरात, व्हॉट्स ॲपवर स्टेटस ठेवून खत्यांची विक्री केली.
६०० सेंद्रिय खतांच्या बॅगचे प्रकरण, कृषी विभागाची सारवासारव सुरु, अनेक ठिकाणी खत विकल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आणि जेवण
* या विक्रेत्याने खतांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी काही शेतकऱ्यांच्या बगिच्यांमध्ये कार्यक्रमदेखील ठेवला होता व त्यामध्ये संत्रा उत्पादकांना आमंत्रित केले. येथे उपस्थितांना जेवणदेखील दिले होते, अशी माहिती समोर आली आहे.
* अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील रहिवासी सदर व्यक्ती अंजनगाव सुर्जी येथे वास्तव्याला आला व अमरावती जिल्ह्यात गोरखधंदा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
स्टेटसवर शेतकऱ्यांसह सेंद्रिय खतांचे फोटो
* प्रकरणातील विक्रेत्याने अप्रमाणित सेंद्रिय खत काही शेतकऱ्यांच्या शेतात पोहच करून दिली व शेतकऱ्यासह खतांचे फोटोदेखील काढले व त्याचे स्वतः च्या व्हॉटसॲप स्टेटसवर ठेवले होते.
* समाजमाध्यमाद्वारे सेंद्रिय खताची अशी जाहिरात करीत असल्याची माहिती याच व्यवसायातील एका कंपनीच्या अधिकाऱ्याने 'लोकमत ऍग्रो'ला दिली.
अनेक भागात खतांची विक्री
त्याने हनुवतखेडा परिसरात, शिरजगाव कसबा, ब्राम्हणवाडा थडी, हिवरखेड आदी भागात खतांची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.
परवाना नसताना हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता.
'कृषी'च्या अधिकाऱ्यांना जरा उशिरानेच जाग आली व त्यातही सारवासारवचा प्रकार जास्त होता.
'लोकमत ऍग्रो'मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सील केल्याचे १४ व्या दिवशी एफआयआर करण्यात आला.
सेंद्रिय खत कंपनी, कंपनीचे अधिकारी व विक्रत्याविरुद्ध मोर्शी ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या तपासात बरीचकाही माहिती समोर येणार आहे. - राहुल चौधरी, कृषी अधिकारी, पंचायत समिती मोर्शी
हे ही वाचा सविस्तर : Organic Fertilizer : अखेर एफआयआर झाला दाखल; अवैध खत विक्री प्रकरण वाचा सविस्तर