Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेख विभागात नवीन ७२१ भूकरमापकांना नियुक्तीचे आदेश; येत्या महिनाभरात होणार रुजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:30 IST

bhukarmapak nikal 2026 भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गासाठी परीक्षा घेण्यात आल्यानंतर ९०३ पदांपैकी ७२१ पदांवरील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे : भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गासाठी परीक्षा घेण्यात आल्यानंतर ९०३ पदांपैकी ७२१ पदांवरील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

तर उर्वरित १२४ जागांवरील उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. हे उमेदवार येत्या महिनाभरात विभागात रुजू होतील, अशी माहिती प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त विकास गजरे यांनी दिली.

भूकरमापक पदाच्या भरतीसाठी ३४ हजार ५३२ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी ३० हजार ६५६ उमेदवारांनी ऑनलाइनपरीक्षा दिली. ही परीक्षा १३ व १४ नोव्हेंबर या दोन दिवसांत प्रत्येकी दोन सत्रांमध्ये घेण्यात आली.

पुणे विभागात भूकरमापकांची ८३ पदे असून त्यासाठी २ हजार ९७३ उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली. कोकण विभागातील २५९ जागांसाठी ८ हजार १४८ उमेदवारांनी, नाशिक विभागातील १२४ जागांसाठी ४ हजार ३४० उमेदवारांनी परीक्षा दिली.

तर संभाजीनगर विभागातील २१० जागांसाठी ८ हजार २७६, अमरावती विभागातील ११७ जागांसाठी ३ हजार ६७९ उमेदवारांनी आणि नागपूर विभागातील ११० जागांसाठी ३ हजार २४० उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली होती, असे सूत्रांनी सांगितले.

ऑनलाइन परीक्षेस उपस्थित सर्व उमेदवारांचा विभागनिहाय गुणानुक्रमे निकाल ३० जानेवारी रोजी संकेतस्थळावर तसेच संबंधित भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आला.

त्यानंतर निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर ७२१ उमेदवारांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली आहेत.

तर १२४ उमेदवार पडताळणीच्या प्रक्रियेत आहेत. यात वैद्यकीय प्रमाणपत्र, खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र तसेच माजी सैनिक असल्याच्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

नियुक्तिपत्रे देण्यात आलेले उमेदवार येत्या महिनाभरात विभागात रुजू होतील. या एकूण ९०३ जागांपैकी माजी सैनिकांच्या ५८ जागांवर उमेदवार मिळाले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

भूकरमापक पदासाठी एकूण ३४ हजार ५३२ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरलेले होते. त्यापैकी ३० हजार ६५६ उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली.

विभागनिहाय उमेदवार नियुक्तीपुणे - ७१मुंबई - २२२नाशिक - ९७संभाजीनगर - १५९अमरावती - ८८नागपूर - ८४एकूण - ७२१

अधिक वाचा: यंदा दुष्काळाची शक्यता; वाचा मान्सूनबाबत हवामान विभागाने दिलेला पहिला दीर्घकालीन अंदाज

English
हिंदी सारांश
Web Title : 721 Land Surveyors Appointed in Land Records Department, Joining Soon

Web Summary : The Land Records Department appointed 721 land surveyors after exams for 903 posts. Candidates will join within a month after document verification. 30,656 candidates appeared for the online exam. Department-wise appointments include Pune (71), Mumbai (222), Nashik (97).
टॅग्स :राज्य सरकारसरकारमहसूल विभागपरीक्षामुंबईपुणेनाशिकअमरावतीनागपूरऑनलाइन