Lokmat Agro >शेतशिवार > Orange Festival : पुणेकरांसाठी खूशखबर! कोथरूडला भरणार संत्रा महोत्सव; थेट शेतकऱ्यांकडून करा खरेदी

Orange Festival : पुणेकरांसाठी खूशखबर! कोथरूडला भरणार संत्रा महोत्सव; थेट शेतकऱ्यांकडून करा खरेदी

Orange Festival: Good news for Pune residents! Orange Festival to be held in Kothrud; Buy directly from farmers | Orange Festival : पुणेकरांसाठी खूशखबर! कोथरूडला भरणार संत्रा महोत्सव; थेट शेतकऱ्यांकडून करा खरेदी

Orange Festival : पुणेकरांसाठी खूशखबर! कोथरूडला भरणार संत्रा महोत्सव; थेट शेतकऱ्यांकडून करा खरेदी

उत्पादकांमार्फत उत्तम प्रतिचा मृग बहारातील चवीला गोड असणारा अस्सल नागपूरी संत्रा, संत्र्याचा चवदार ताजा रस, संत्रा बर्फी व इतर संत्रा उत्पादने ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध होणार आहे.

उत्पादकांमार्फत उत्तम प्रतिचा मृग बहारातील चवीला गोड असणारा अस्सल नागपूरी संत्रा, संत्र्याचा चवदार ताजा रस, संत्रा बर्फी व इतर संत्रा उत्पादने ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Pune : पुणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून किंवा उत्पादकांकडून संत्रा खरेदी करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून दरवर्षी संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे यंदाचा संत्रा महोत्सव पुण्यातील कोथरूड येथे आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. 

दरम्यान, संत्रा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया ही पणन मंडळाच्या अमरावती व नागपूर विभागीय कार्यालयाकडे करण्यात आलेली असून यावेळी सुमारे ५० संत्रा उत्पादक सहभागी होणार आहेत. या उत्पादकांना पुण्यातील गांधी भवन, कोथरूड येथे सुमारे २५ स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंडळाकडून मिळाली आहे. 

या उत्पादकांमार्फत उत्तम प्रतिचा मृग बहारातील चवीला गोड असणारा अस्सल नागपूरी संत्रा, संत्र्याचा चवदार ताजा रस, संत्रा बर्फी व इतर संत्रा उत्पादने ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध होणार आहे. विदर्भातील उच्च प्रतीच्या नागपूरी संत्रा व इतर उत्पादित पदार्थाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी पणन मंडळाने केले आहे.

कधी असेल महोत्सव
कोथरूडमधील गांधी भवन येथे २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरीता सहाय्यक सरव्यवस्थापक मंगेश कदम (7588022201) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Orange Festival: Good news for Pune residents! Orange Festival to be held in Kothrud; Buy directly from farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.