अहिल्यानगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे चार वर्षांपासून वादात अडकलेला रस्ता महसूल प्रशासनाने खुला करून दिल्याने तक्रारदार शेतकऱ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
शेतात जाण्याचा रस्ताच बंद केल्याने पिंपळगाव माळवी येथील शेतकरी महादेव भोसले, गोरक्षनाथ भोसले आदी शेतकऱ्यांची जमीन पडीक होती.
याबाबत या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे अर्ज करीत रस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती. याबाबत तहसीलदारांनी सकारात्मक भूमिका घेत अर्जदार शेतकऱ्यांच्या बाजूने शेतातून जाण्यासाठी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले.
मात्र, वादीने या निकालाविरोधात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील केले होते. हा निर्णयही वादीच्या विरोधात गेला व रस्ता खुला करण्याचे आदेश देण्यात आले.
त्यानंतर कृषी दिनाचे औचित्य साधून सावेडी मंडळ अधिकारी शैलजा देवकाते यांच्या प्रमुख उपस्थितीत अखेर हा रस्ता खुला करण्यात आला.
यावेळी महादेव भोसले, गोरक्षनाथ भोसले, भगवान भोंदे, नारायण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गोरख आढाव, निर्मला भोंदे, तलाठी सागर ठोंबरे, तलाठी नितीन काळे, सागर भोंदे, शुभम भोंदे, दादासाहेब भोंदे, रेणूबाई भोंदे आदींसह पोलिस व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार संजय शिंदे यांच्या वतीने सावेडी मंडळ अधिकारी शैलजा देवकाते यांच्या पुढाकाराने चार वर्षापासून बंद असलेला शेतकऱ्यांचा रस्ता खुला झाल्याने देवकाते यांचा सत्कार केला.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील 'ह्या' कारखान्याने केला विक्रम; सात वेळा ठरला देशात सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना