Lokmat Agro >शेतशिवार > सातपुड्यातील सीताफळ विक्रीतून होतोय रोजगार उपलब्ध

सातपुड्यातील सीताफळ विक्रीतून होतोय रोजगार उपलब्ध

of Sitaphals in Satpura | सातपुड्यातील सीताफळ विक्रीतून होतोय रोजगार उपलब्ध

सातपुड्यातील सीताफळ विक्रीतून होतोय रोजगार उपलब्ध

सीताफळांचा भावही आवाक्यात..

सीताफळांचा भावही आवाक्यात..

शेअर :

Join us
Join usNext

सातपुड्यातील रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेले सीताफळ मोठ्या प्रमाणावर तळोद्याच्या बाजारपेठेत दाखल होत असून, सीताफळ विक्रीतून मोठा रोजगार उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा सातपुड्यातील सीताफळे यंदा परदेशातही विकले जाऊ लागले आहेत.

शहरातील बिरसा मुंडा चौकात सायंकाळपासून मोठ्या प्रमाणावर चांदसैली, धडगाव तसेच सातपुडा पायथा परिसरातील विविध गावांतून मोठ्या संख्येने ग्रामस्थ आपली टोपली भरून सीताफळ विक्रीसाठी दाखल होत असून, रात्री उशिरापर्यंत सीताफळ खरेदीसाठी अशी लगबग असते. तसेच पहाटेपासूनही मोठ्या प्रमाणावर शहर तसेच तालुक्यातील विविध ग्रामीण भागातून सीताफळ खरेदीसाठी ग्रामस्थ येत असल्याचे चित्र असून, सीताफळाचा भावही आवाक्यात असल्याने मोठी मागणी आहे.

सातपुड्यातील सीताफळांचा गोडवा यंदा पोहोचला परदेशात

दरम्यान, सातपुडा पर्वतरांगांमध्ये तसेच तळोदा, धडगाव तालुक्यातील शेतशिवार, घराच्या अवतीभवती सीताफळांचे मोठ्या प्रमाणात झाडे असून, नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली सीताफळ खाण्यास अतिशय चविष्ट असल्याने खवय्यांकडून मोठ्या प्रमाणावर त्याची मागणी आहे. यावर्षी सीताफळाचा हंगाम जोरात असून, आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे.

चिमुकल्यांकडून बियांचे संकलन

  • तालुक्यातील रोझवा, रोझवा पुनर्वसनसह परिसरात मोठ्या प्रमाणावर घरांच्या अवतीभोवती सीताफळ असल्याने ही चिमुकल्यांकडून सीताफळ खाण्यात येत आहे.
  • सीताफळाच्या बियांचे संकलन करण्यात येत असून, ते त्या बिया आपापल्या शेताच्या बांधावर तसेच रस्त्याच्या कडेला लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून सीताफळाच्या झाडांचे संगोपन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • उपलब्ध होत असून, साधारणतः ३० ते ५० रुपये किलोच्या दराने मिळत असून, मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आलेले सीताफळ जिल्हा बाहेरही आपापल्या नातेवाइकांकडे पोहोचवण्यात येत असल्याचे चित्र आहे.

Web Title: of Sitaphals in Satpura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.