मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळानेडिजिटल पाऊल टाकत आपले स्वतंत्र मोबाइल अॅप लाँच केले आहे.
यामुळे लाभार्थ्यांना कर्ज प्रक्रियेसाठी आता सायबर कॅफे किंवा एजंटांच्या दारी जाण्याची गरज उरणार नाही.
अवघ्या एका 'क्लिक'वर संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
आतापर्यंत लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी संगणकाचा किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता.
यात अनेकदा तांत्रिक अडचणी येत आणि काही प्रकरणांमध्ये एजंटांकडून फसवणुकीचे प्रकारही घडले होते. हे टाळण्यासाठी 'यूजर फ्रेंडली' अॅपची घोषणा केली आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल.
फक्त ८५ रुपयांत सेवाज्या लाभार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही, त्यांच्यासाठी महामंडळाने 'आपले सरकार' केंद्रांशी करार केला असून, केवळ ८५ रुपयांत या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
हायटेक पाऊल◼️ महामंडळाने केवळ अॅपच नाही, तर जिओ-फेन्सिंग आणि ई-एचआरएमएस प्रणालीचाही वापर सुरू केला आहे.◼️ गुगल मॅपच्या साहाय्याने जिल्हा समन्वयक व्यवसायाची पाहणी करतील.◼️ यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना तातडीने मदत मिळणे सोपे होणार आहे.◼️ जास्तीत जास्त तरुण उद्योजकांनी या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
अॅपमधील प्रमुख वैशिष्ट्ये◼️ एकाच ठिकाणी सर्व टप्पे : एलओआय, सँक्शन आणि क्लेम सादर करणे अशा तिन्ही प्रक्रिया मोबाईलवरूनच पूर्ण होतील.◼️ कागदपत्रे अपलोड : कागदपत्रे स्कॅन करून अॅपवर टाकता येतील.◼️ अर्जाची स्थिती : आपल्या अर्जाचे नेमके काय झाले, याची रिअल-टाइम माहिती मिळणार.◼️ जिओ-टॅगिंग अनिवार्य : व्यवसाय प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री करण्यासाठी आता व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करावे लागेल.
अधिक वाचा: तुम्ही खाताय ते पनीर आहे की चीज अॅनालॉग? एकसारख्या दिसणाऱ्या या पदार्थांत नक्की काय आहे फरक?
Web Summary : Annasaheb Patil Corporation launches mobile app for easy loan applications. Maratha youth can now apply directly, avoiding cyber cafes and agents. The app offers transparent processes, document uploads, and real-time application status updates. Assistance is available at 'Aaple Sarkar' centers for those without smartphones.
Web Summary : अण्णासाहेब पाटिल महामंडल ने ऋण आवेदन के लिए मोबाइल ऐप लॉन्च किया। मराठा युवा अब सीधे आवेदन कर सकते हैं, साइबर कैफे और एजेंटों से बचकर। ऐप पारदर्शी प्रक्रियाएं, दस्तावेज़ अपलोड और वास्तविक समय में आवेदन की स्थिति अपडेट प्रदान करता है। स्मार्टफोन के बिना लोगों के लिए 'आपले सरकार' केंद्रों पर सहायता उपलब्ध है।