शासनाने ई-हक्क प्रणाली सुरू केली असून त्याअंतर्गत अकरा विविध सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत. त्यामुळे वारस नोंद इ करार, कर्जाचा बोजा चढविणे अशा कामांसाठी शेतकऱ्यांना यापुढे तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
नागरिकांना यापूर्वी काही कामांसाठी तलाठी कार्यालयातच जावे लागत होते परंतु आता ती गरज उरलेली नाही. ई हक्क प्रणालीद्वारे ११ प्रकारच्या सेवा आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. महा ई सेवा केंद्राद्वारे नागरिक त्याचा लाभ घेऊ शकतात.
सात-बारा उताऱ्यातील अडचणी, फेरफार नोंदींचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ई हक्क प्रणालीद्वारे अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच दाखल झाले आहेत.
शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी देण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना सुरू केली आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना कर्ज किंवा इतर कामांसाठी इतर उतारे देण्याची गरज लागणार नाही.
ई-हक्कद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा
◼️ जमीन खरेदी-विक्री (Sale-Purchase Mutation)
◼️ वारसाहक्क नोंदणी (Inheritance Mutation)
◼️ कौटुंबिक वाटणी (Partition Mutation)
◼️ न्यायालयीन आदेशावर आधारित नोंदी.
◼️ बोजा कमी करणे.
◼️ एकत्र कुटुंब नोंद कमी करणे.
◼️ अपाक शेरा कमी करणे.
◼️ इ.करार नोंद.
◼️ विश्वस्ताचे नाव कमी करणे.
◼️ बोजा चढविणे/गहाणखत.
◼️ संपत्तीचे हस्तांतरण (Transfer of Rights)
◼️ मृताचे नाव कमी करणे.
अधिक वाचा: माळरानावर केली फणसाची शेती; वर्षातून सलग आठ महिने उत्पन्न देणाऱ्या थायलंड फणसाचा प्रयोग यशस्वी
