Lokmat Agro >शेतशिवार > गोदाम व तेलबिया प्रक्रिया युनिटसाठी आता एकाच योजनेतून मिळणार अनुदान; वाचा सविस्तर

गोदाम व तेलबिया प्रक्रिया युनिटसाठी आता एकाच योजनेतून मिळणार अनुदान; वाचा सविस्तर

Now subsidy will be available for warehouse and oilseed processing unit from a single scheme; Read in detail | गोदाम व तेलबिया प्रक्रिया युनिटसाठी आता एकाच योजनेतून मिळणार अनुदान; वाचा सविस्तर

गोदाम व तेलबिया प्रक्रिया युनिटसाठी आता एकाच योजनेतून मिळणार अनुदान; वाचा सविस्तर

Godam Yojana राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत जिल्ह्यात २५० टन गोदाम बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

Godam Yojana राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत जिल्ह्यात २५० टन गोदाम बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत जिल्ह्यात २५० टन गोदाम बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

याच योजनेतून तेलबिया प्रक्रिया युनिटही बांधण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी ३० ऑगस्टची मुदत आहे.

प्रत्यक्ष गोदाम बांधकामाच्या झालेल्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान मिळणार आहे.

काढणीपश्चात पायाभूत सुविधांतर्गत तेलबिया प्रक्रिया युनिट (१० टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे यासाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के कमाल ९ लाख ९० हजार रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.

काढणीपश्चात पायाभूत सुविधा याअंतर्गत तेलबिया प्रक्रिया युनिट निवडलेल्या लाभार्थ्याने स्वखर्चाने प्रकल्प तयार केला असल्यास प्रकल्पाचे मूल्यांकन, मूल्यमापन व उभारणीनंतर मूल्यांकन करून किंवा निवडलेल्या लाभार्थ्याने राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेतले असल्यास कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार लाभास पात्र राहील.

इच्छुक शेतकरी संघ व कंपन्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले.

अधिक वाचा: काजू खावी तशी चव लागणारी देशी शेंग; लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांचा भुईमूग लागवडीचा हटके पॅटर्न

Web Title: Now subsidy will be available for warehouse and oilseed processing unit from a single scheme; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.