शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीयीकृत बँकांकडूनपीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
jansamarth portal जनसमर्थ पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना आता घरबसल्या पीक कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज मिळू शकणार आहे.
अर्जासाठी आवश्यक बाबी
◼️ अर्जासाठी शेतकरी आयडी असणे बंधनकारक.
◼️ आधारकार्ड.
◼️ आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर.
◼️ बँक पासबुक.
◼️ पॅनकार्ड आवश्यक राहणार आहे.
कसा होणार फायदा
◼️ जनसमर्थ पोर्टलमुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी वारंवार बँकांच्या मारण्याची गरज भासणार नाही.
◼️ तसेच विनाकारण फेऱ्या कर्ज नाकारले जाणार नाही व कमीत कमी कालावधीत कर्ज मंजूर होण्यास मदत होणार आहे.
◼️ या ऑनलाईन प्रक्रियेसाठी कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही.
◼️ दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज मिळू शकणार.
पैसे मागितल्यास तक्रार करा
◼️ या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
◼️ तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी यांच्या समन्वयाने वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.
◼️ तसेच सेतू केंद्र, महा ई-सेवा केंद्र व ग्राहक सेवा केंद्रांचाही या प्रक्रियेत सहभाग असणार आहे.
◼️ अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत असणार आहे.
◼️ कुणी पैसे मागितल्यास जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी.
◼️ अर्ज भरून घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आता शिबिर राबवले जाणार आहे.
अधिक वाचा: राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जाची मर्यादा वाढवली; आता हेक्टरी किती मिळणार कर्ज?
